fbpx
Thursday, December 7, 2023
BusinessLatest News

गंधार ऑइल रिफायनरी (इंडिया) लिमिटेडचा आयपीओ  22 नोव्हेंबर रोजी खुला होणार 

मुंबई : गंधार ऑइल रिफायनरी (इंडिया) लिमिटेडचा (कंपनी) आयपीओ बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 रोजी खुला होणार आहे.  बोली/ऑफर शुक्रवार, 24 नोव्हेंबर, 2023 रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली/ऑफर मंगळवार, 21 नोव्हेंबर 2023 रोजी खुली होईल.

गंधार ऑइल रिफायनरी (इंडिया) लिमिटेडच्या प्रत्येक इक्विटी समभागासाठी 160 ते 169 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी 14,872 इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त इक्विटी समभागांसाठी 88 च्या पटीत बोली लावता येईल.

या आयपीओमध्ये एकूण 3,020 मिलियन रुपयांपर्यंतच्या नव्याने जारी करण्यात आलेल्या (फ्रेश इश्यू) इक्विटी समभागांचा तसेच समभाग विक्री करू इच्छित असलेल्या समभागधारकांकडून 11,756,910 पर्यंत इक्विटी समभागांच्या विक्रीसाठीच्या ऑफरचा समावेश असेल.  समभाग विक्री करू इच्छित असलेल्या समभागधारकांमध्ये रमेश बाबुलाल पारेख (समभाग विक्री करत असलेले प्रमोटर) 2,250,000 पर्यंत इक्विटी समभाग,  कैलाश पारेख यांच्याकडून 2,250,000 पर्यंत इक्विटी समभाग, श्रीमती गुलाब पारेख यांच्याकडून 2,250,000 पर्यंत इक्विटी समभाग (  कैलाश पारेख आणि श्रीमती गुलाब पारेख हे एकत्रितपणे ‘समभाग विक्री करत असलेला प्रमोटर ग्रुप’ म्हणून संबोधण्यात आले आहेत) ग्रीन डेझर्ट रिअल इस्टेट ब्रोकर्स यांच्याकडून 3,000,000 पर्यंत, डेनवर बिल्डिंग मॅट अँड डेकोर टीआर एलएलसी यांच्याकडून 1,000,000 पर्यंत, फ्लीट लाईन शिपिंग सर्व्हिसेस एलएलसी यांच्याकडून 1,000,000 पर्यंत,   सुनीत मेनन यांच्याकडून 1,970  पर्यंत,  विजेंद्र सुमतीलाल पटनी यांच्याकडून 1,970  पर्यंत,  विनय प्रभाकर उलपे यांच्याकडून 1,970  पर्यंत आणि  मयूर भूपेंद्रलाल देसाई यांच्याकडून 1,000 पर्यंत इक्विटी समभागांचा समावेश आहे. (ग्रीन डेझर्ट रिअल इस्टेट ब्रोकर्स, डेनवर बिल्डिंग मॅट अँड डेकोर टीआर एलएलसी, फ्लीट लाईन शिपिंग सर्व्हिसेस एलएलसी, सुनीत मेनन, विजेंद्र सुमतीलाल पटनी, विनय प्रभाकर उलपे आणि श्री मयूर भूपेंद्रलाल देसाई या सर्वांना एकत्रितपणे ‘समभाग विक्री करत असलेले इतर समभागधारक’ असे संबोधण्यात आले आहे) (समभाग विक्री करत असलेले प्रमोटर, प्रमोटर ग्रुप आणि इतर समभागधारक यांना एकत्रितपणे समभाग विक्री करत असलेले समभागधारक असे संबोधण्यात आले आहे आणि त्यांनी विक्रीसाठी प्रस्तुत केलेल्या समभागांना ऑफर्ड शेयर्स असे संबोधण्यात आले आहे.)

 

नव्याने जारी करण्यात आलेल्या समभागांच्या विक्रीतून जी रक्कम उभी राहील तिचा वापर पुढीलप्रमाणे करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे – (1) टेक्सोलने बँक ऑफ बरोडाकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी/मुदतपूर्व परतफेडीसाठी कर्जाच्या माध्यमातून टेक्सोलमध्ये गुंतवणूक (2) कंपनीच्या सिल्वासा प्लांटमध्ये ऑटोमोटिव्ह ऑइलच्या क्षमतेचा विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांची खरेदी आणि सिव्हिल कामामार्फत भांडवली खर्च (3) कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी (4) सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी.

 

ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, 1957 च्या नियम 19 (2) (बी) अनुसार,  संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम 31 नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम 6(1) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी 50% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील.  यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी 60% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील.

 

नेट क्यूआयबी पोर्शनपैकी 5% हे प्रपोर्शनेट बेसिसवर फक्त म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट बेसिसवर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे.

 

पण जर म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी ही नेट क्यूआयबी पोर्शनच्या 5% पेक्षा कमी असेल तर म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये वाटपासाठी उपलब्ध असलेल्यांपैकी उरलेले इक्विटी समभाग क्यूआयबीना (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट वाटपासाठी उर्वरित नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील, यामध्ये म्युच्युअल फंडांचाही समावेश असेल, पण त्यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त बोली येणे आवश्यक आहे. नेट ऑफरचा कमीत कमी 15% भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल खरेदीदारांना सेबी आयसीडीआर नियमांनुसार, प्रपोर्शनेट बेसिसवर वाटपासाठी पुढीलप्रमाणे उपलब्ध करवून दिला जाईल: (अ) नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी एक-तृतीयांश भाग 2,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि 1०,००,००० रुपयांपर्यंत  ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल (ब) नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी दोन-तृतीयांश भाग 1०,००,००० रुपयांपेक्षा जास्त ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अशाप्रकारच्या कोणत्याही उप-विभागांमध्ये सबस्क्राईब न करण्यात आलेला भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांच्या दुसऱ्या उप-विभागात वाटून दिला जाईल, यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे आणि सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार कमीत कमी 35% नेट ऑफर रिटेल इंडिविज्युअल बिडर्सना वाटून देण्यासाठी उपलब्ध राहील, यासाठी ऑफर प्राईसइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या पात्र बोली येणे आवश्यक आहे. सर्व संभाव्य बिडर्स बोली लावणारे सर्व (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.

 

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत करण्यात आलेले इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत. (“एनएसई” बीएसई व एनएसई यांना एकत्रितपणे स्टॉक एक्सचेंजेस असे संबोधण्यात आले आहे)

 

नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (आधीची एडेलवीज सिक्युरिटीज लिमिटेड) आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

 

या वृत्तातील ज्या संज्ञांचा अर्थ, व्याख्या देण्यात आलेली नाही त्यांचा जो अर्थ आरएचपीमध्ये आहे तोच ग्राह्य मानला जाईल.

Leave a Reply

%d