धाराशीव येथे होत असलेली वरीष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अनाधिकृत, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे परीपत्रक जारी
पुणे : भारतीय कुस्ती महासंघास महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संलग्न असल्याने भारतीय कुस्ती महासंघाने काल जारी केलेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने आपले परिपत्रक जारी करुन धाराशीव येथे होत असलेली वरीष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ही अनाधिकृत म्हणुन जाहीर केली असुन त्या स्पर्धेत कुस्तीगीर संघाचे कुस्तीगीर , पंच व कुस्ती प्रशिक्षक यांनी सहभाग घेतला तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत …
६५ वी वरीष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अस्थाई समितीचे अध्यक्ष संजय सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड येथे दी.१० ते १४ जानेवारी दरम्यान संपन्न झाली या स्पर्धेच्या बक्षिस समारंभास भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष श्री ब्रिजभुषन सिंह व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित होते… असे असताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषद त्या स्पर्धेस अनाधिकृत म्हणुन जर जाहीर करत असेल व पुन्हा ६५ वी वरीष्ठ राज्य अजिंक्यपद स्पर्धा धाराशीव येथे आयोजित करण्याचा प्रयत्न करत असेल तर भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ त्यास अधिकृत म्हणुन कसा दर्जा देईल हा साधा प्रश्न पै.काकासाहेब पवार , विजयकाका बराटे व वैभव लांडगे यांना पडायला हवा…
आज सकाळी वरील ३ जणांचे नाव टाकुन एक पत्र सोशल मिडीयावर प्रसारीत करण्यात आले त्या अनुषंगाने माझा या ३ जणांना सवाल आहे की , कोथरूड येथे झालेली ६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आपण अधिकृत समजा की अनाधिकृत ?
हे पहा भारतीय कुस्ती महासंघाच्या लेटरहेडवर परीपत्रक काढल्याने महाराष्ट्रातील कुस्तीगीर , पंच व कुस्ती प्रशिक्षक या सर्वांना ते बंधनकारक आहे. त्यामुळे उगाचच कोणी कोणता मेसेज व्हायरल करुन सर्वांची दीशाभुल करण्याचा प्रयत्न करु नये …जो पर्यंत भारतीय कुस्ती महासंघ त्यांच्या लेटरहेडवर परत कोणत्या बदलाचे पत्र प्रसारीत करत नाही तो पर्यंत हे परीपत्रक महाराष्ट्रातील सर्वांना बंधनकारक राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी
महाराष्ट्रातील तमाम कुस्तीगीर , तांत्रिक अधिकारी , कुस्ती मार्गदर्शक व कुस्ती शौकीन यांना मी सांगु इच्छितो की , महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषदेची संलग्नता गेली असल्याने WFI व IO यांच्या दृष्टिकोणातुन तिचे महत्व संपुष्टात आलेले आहे, मागील १ वर्षापासून कुस्तीगीर परीषदेचा कोणता संघ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी करुन घेतलेला नाही , कुस्तीगीर परीषदेचे काही पदाधिकारी आपल्या स्वार्थासाठी कुस्तीगीरांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील भवितव्य धोक्यात आणु पहात आहे.भारतीय कुस्ती महासंघ आपल्या सर्वांची पितृ संघटना असुन त्याने काढलेला आदेश आपल्या सर्वांसाठी शिरसंवाद आहे…त्या आदेशाच्या विरुध्द निर्णय घेऊन कोणी आपले कुस्ती करीयर खराब करु नये ….
एका जत्रेने देव म्हातारा होत नाही तसेच एक अनाधिकृत स्पर्धा नाही खेळली म्हणजे करीयर काही उध्वस्त होत नाही त्यामुळे ज्या कुस्तीगीरांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा खेळावयाच्या आहेत त्यांनी कृपया भारतीय कुस्ती महासंघाच्या आदेशाचे पालन करावे ..