fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

‘असा झाला राज्याभिषेकातून’ साकारला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 

पुणे : रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याची सुरु झालेली लगबग… दिवाळी दसरा असल्याप्रमाणे रायगडाच्या पायथ्याशी सजलेली गावे… महाराजांसाठी तयार केलेले ३२ मण सोन्याचे सिंहासन… जगदीश्वराच्या दर्शनाला जाताना निघालेली भव्य मिरवणूक… लेझीम, ढोल ताशा, शाहीरांचे डफ तुणतुणी, नगारखान्यातील गर्जणारी सर्व वाद्य…बाजारात महाराजांवर चहुबाजूंनी होणारा फुलांचा वर्षाव… महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील शिवराज्याभिषेक ही एक अविस्मरणीय घटना पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळाली.
दिवाळीमध्ये इतिहास प्रेमी मंडळाच्यावतीने दरवर्षी भव्य दुर्ग प्रतिकृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी मंडळाच्या वतीने प्रदर्शनांतर्गत ‘असा झाला राज्याभिषेक’ या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनारोहण दाखवण्यात आले आहे. हे प्रदर्शन शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत साकारण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन निवृत्त लष्कर अधिकारी कर्नल संजय करोडपती तसेच ‘डावी वाळवी’ या पुस्तकाचे लेखक अभिजीत जोग, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांच्या उपस्थितीत झाले.
मोहन शेटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून यंदाच्या वर्षी ‘असा झाला राज्याभिषेक’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शनात रायगडावरील सजवलेल्या नगारखान्यापासून बाजारपेठेतून जगदीश्वर मंदिराकडे हजारो मावळ्यांच्यासह ढोल ताशांच्या गजरात हत्तीवरून निघालेले छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. तसेच रायगडावरील वास्तूंच्या हुबेहूब प्रतिकृती, अभ्यासपूर्ण निवेदन, दिव्यांची आकर्षक रचना ही या प्रदर्शनाची वैशिष्ट्ये आहेत.  हे प्रदर्शन दिनांक २० नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते १ व सायंकाळी ५ ते १० या वेळात खुले असणार आहे.

Leave a Reply

%d