स्पार्क प्रायव्हेट वेल्थ मॅनेजमेंटने आपली व्याप्ती वाढवत पुण्यात नवीन शाखा केली स्थापन
पुणे: स्पार्क पीडब्ल्यूएम प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी स्पार्क फॅमिली ऑफिस अँड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे), किंवा स्पार्क प्रायव्हेट वेल्थ मॅनेजमेंट, स्पार्क कॅपिटल अॅडव्हायझर्स (इंडिया) लिमिटेडची उपकंपनी, दोन दशके- जुन्या मिड-मार्केट इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिस फर्मने आज पुण्यात आपली नवीन शाखा सुरू करण्याची घोषणा केली.
स्पार्क पीडब्ल्यूएम (प्रायव्हेट वेल्थ मॅनेजमेंट) ही सर्वात वेगाने वाढणारी फायनान्शिअल सर्व्हिस कंपन्यांपैकी एक आहे जिने अलीकडेच लक्षणीय एयुएम वाढ पाहिली आहे. कंपनी स्पार्क कॅपिटलच्या मूळ मूल्यांचा विस्तार करते आणि स्पार्क कॅपिटलचे इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि ऍसेट मॅनेजमेंट कौशल्य समाकलित करते आणि वेल्थ मॅनेजमेंट शी संबंधित ग्राहकांना त्यांच्या गरजांमध्ये सल्ला देण्यासाठी आणि त्यांना समर्थन देण्यासाठी बिस्पोक आयडिया आणि उपाय तयार करते.
पुणे शाखेच्या उद्घाटनाबाबत बोलताना, स्पार्क पीडब्ल्यूएमच्या सह- मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पिता विनय म्हणाल्या, “आम्ही आमच्या नवीन शाखेच्या उद्घाटनाची अभिमानाने घोषणा करत असताना आजचा दिवस आमच्या साठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्पार्क पीडब्ल्यूएम मध्ये, आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या संपत्ती वाढवण्याच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आणि एक प्रतिष्ठित व अत्यंत शिफारस केलेली प्रायव्हेट वेल्थ फ्रँचायझी तयार करण्याच्या त्यांच्या प्रवासात सक्षम बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
स्पार्क पीडब्ल्यूएम कडे अनुभवी खाजगी बँकर्स आणि डोमेन तज्ञांची एक मजबूत अशी टीम आहे. ओपन आर्किटेक्चर प्लॅटफॉर्मसह, इंडस्ट्री लिडिंग इन्व्हेस्टमेंट मॅनॅजमेन्ट आणि तज्ञांकडून बेस्ट -इन-क्लास सोल्यूशन्स प्रदान करतो. मल्टी -फॅमिली ऑफिस प्रस्ताव सर्वसमावेशक पोर्टफोलिओ देखरेख, इन्व्हेस्टमेंट मॅनॅजमेन्ट, इस्टेट प्लानिंग आणि अल्ट्रा एचएनआय फॅमिली साठी कर सेवा देते, स्वारस्यांचे संपूर्ण संरेखन देखील सुनिश्चित करते. कंपनीची प्रमुख भारतीय शहरांमध्ये उपस्थिती आहे, ज्यामध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे यांचा समावेश आहे, याठिकाणी सॅटेलाईट लोकेशन सेवा उपलब्ध आहे.