fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

बीजेएसच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोमल जैन यांची निवड


पुणे : आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत कामाचा दीर्घ अनुभव असलेल्या कोमल जैन यांची भारतीय जैन संघटना (बीजेएस) आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या (एसएमएफ) व्यवस्थापकीय संचालकपदी निवड करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. व्यवस्थापन, स्ट्रॅटेजी, डिझाईन थिंकिंग, बिझनेस स्टोरीटेलिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात त्यांचा विशेष अभ्यास आहे. कमी वयात बीजेएसच्या उच्चपदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.
कोमल जैन यांनी कला आणि डिझाइन क्षेत्रातील शिक्षणासह बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी प्राप्त केली. आतापर्यंत जगातील शंभरपेक्षा जास्त बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत विविध डोमेनवर काम केले आहे. त्यामध्ये अॅपल, गुगल, हबस्पॉट, मर्क, बार्कलेज, कार्डिनल, फोक्सवॅगन, कॉक्स आणि काही जागतिक ब्रँड तसेच सरकारी संस्थांसोबत नाविन्यपूर्ण सहभागाचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे एक्सेंचरसोबत इनोव्हेशनमध्ये ५ वर्षे काम केले आहे. अनेक संस्था, स्टार्टअप आणि एसएमई मध्ये त्यांचा प्रमुख सहभाग राहिलेला आहे.
कोमल जैन या एक इनोव्हेशन स्ट्रॅटेजिस्ट आहेत. त्यांना संपूर्ण उद्योग आणि जागतिक ब्रँडचा कामाचा दीर्घ अनुभव आहे. सध्या लर्निंग आणि नॉलेज मॅनेजमेंटमध्ये त्या काम करत आहेत. इनोव्हेट आणि इन्फ्लुएन्स डोमेनचा एक भाग असल्याने डिझाईन थिंकिंग आणि बिझनेस स्टोरीटेलिंग हे त्यांच्या कौशल्याचे प्रमुख क्षेत्र आहेत.
कंपन्या, संस्थांमध्ये नवकल्पना आणि सांस्कृतिक-परिवर्तनासाठी उत्प्रेरक म्हणून सर्जनशीलतेचा वापर करण्यात त्यांचा हातखंडा आहे. विशेषत: डिझाईन थिंकिंग आणि बिझनेस स्टोरीटेलिंग वर्कशॉप्सवरील वरिष्ठ-नेतृत्वासाठी एक तज्ज्ञ फॅसिलिटेटर अशी त्यांची खासियत आहे.
कोमल जैन ह्या एक अनुभवी क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे. त्यांचा फ्रीलान्सर म्हणून काही उद्योगांमध्ये काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. दुसरं म्हणजे लेखिका-कवयित्री ही त्यांची खास ओळख असून हिंदी, उर्दू आणि इंग्रजीमध्ये लिहितात. त्यांच्या अनेक कविता वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत. तसेच ‘आर्ट कल्चराती’ नावाचा कलाकारांचा ग्रुप त्यांनी स्थापन केला आहे. कोमल जैन यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्वोच्च करिअर सोडून सामाजिक सेवेत योगदान देण्यासाठी बीजेएस सोबत काम करण्याचा निर्णय घेतला असून समाजासाठी झोकून देऊन काम करणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

%d