कौन बनेगा करोडपती सीझन 15 मध्ये मुक्तांगण फाऊंडेशनने त्यांच्या यशाचे गमक सांगितले
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 15 या अत्यंत लोकप्रिय गेमशोमध्ये ‘दिवाळी स्पेशल वीक’च्या निमित्ताने दिव्यांचा सण सार्थकतेने साजरा करताना मुक्तांगण रिहॅबिलीटेशन सेंटरचा परिचय प्रेक्षकांना करून देण्यात आला. ही संस्था व्यसनाधीन रुग्णांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांना व्यसनमुक्त होण्यास मदत करते.
डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांच्या माता-पित्याच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या या संस्थेचे लक्ष्य ड्रग्स, दारू आणि जीवन नासवणाऱ्या व्यसनांशी लढा देत असलेल्या लोकांना मानसिक उभारी देऊन तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण पद्धतींच्या मदतीने उपचार देऊन त्यांचे सशक्त माणसात रूपांतर करण्याचे आणि त्यांच्या माध्यमातून इतरांनाही प्रेरणा देण्याचे आहे. डॉ. मुक्ता यांनी आपले संपूर्ण जीवन लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. अशा प्रकारे त्या प्रेरणादायक जीवन जगत आहेत. कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात त्यांच्यासोबत आला होता, उत्कृष्ट अभिनेता रणदीप हुड्डा. त्या दोघांनी हॉटसीटवर विराजमान होऊन होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासह ‘उम्मीदोंवाली दिवाली’ साजरी केली.
सामाजिक जागरुकतेचे महत्त्व जाणणाऱ्या रणदीप हुड्डाने या संस्थेच्या उद्दिष्टाशी साम्य असणाऱ्या आपल्या एका सिरिजविषयी सांगितले, ज्यात त्याचा भाऊ अमली पदार्थांच्या आहारी गेला असतो. त्याने सांगितले की, या व्यक्तिरेखेशी तो इतका एकरूप झाला होता की, पडद्यावरील कथानक त्याच्या मनावर आणि जीवनावर विपरीत परिणाम करू लागले होते. अॅक्ट पडद्यावर चालत असला, तरी त्यातून येणारी वेदना मात्र खरीखुरी होती!
पुढे डॉ. मुक्ताने उदाहरणादाखल आपल्या एका रुग्णाचा (मित्राचा) परिचय करून दिला. राहुलच्या उदाहरणातून तिने समजावून दिले की, प्रबळ इच्छाशक्ती आणि मार्गदर्शन असले, तर सर्व काही शक्य असते. औपचारिक शिक्षण मिळवण्याची राहुलची ऐपत नव्हती. त्यामुळे तो भरकटला आणि गुन्हेगारी जगात अडकला. त्याच्या मागे गुंड लागले होते. वाढत्या दबावामुळे तो ड्रग्स आणि दारूकडे वळला आणि शेवटी तुरुंगात गेला. पण, त्यानंतर मुक्तांगणने त्याचे आयुष्य कायमचे पालटून टाकले आणि त्याला दुसरी संधी दिली. आज तो मॅरेथॉन धावक आणि सल्लागार आहे.त्याने बीए पूर्ण केले आहे आणि मानसशास्त्र विषयात तो एमए करत आहे. होस्ट अमिताभ बच्चन आणि सर्व प्रेक्षकांनी राहुलच्या प्रयत्नांचे टाळ्या वाजवून कौतुक केले.
बघा, ‘दिवाली स्पेशल वीक’ कौन बनेगा करोडपती मध्ये रात्री 9:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
