Thursday, April 9, 2026
Latest NewsPUNE

इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ‘लॅम्प लायटिंग’ कार्यक्रम

पुणे : जगातील पहिली परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी मेणबत्ती घेऊन रुग्णांची सेवा केली, त्याचप्रकारे आपण देखील रुग्णांची अविरतपणे सेवा करू व त्यांचा आयुष्यातील अंधार दूर करून त्यांना प्रकाशाकडे नेऊ, यासाठी लॅम्प लायटिंग करून शपथ घेतली जाते. अशीच शपथ रुग्णसेवा करीत आपले कार्य प्रामाणिकपणे बजावण्यासाठी नर्सिंगचा कोर्स करणा-या विद्यार्थीनींनी घेतली.

न-हे येथील कै.उद्धवराव तुळशीराम जाधवर फाऊंडेशन संचलित इन्स्टिटयूट आॅफ नर्सिंग मधील नर्सिंगच्या विद्यार्थीनींचा लॅम्प लायटिंग करून संस्थेच्या सभागृहात शपथ ग्रहण कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. कल्पना कांबळे, नीता पंडित, डॉ.वीणा साखरदंडे, पुष्पा शिंदे,  अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर, नर्सिंगच्या प्राचार्या शितल निकम, उपप्राचार्या अनुश्री पारधी यांसह प्राध्यापक, पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. कल्पना कांबळे म्हणाल्या, पालकांनी मुला-मुलींना नर्सिंगमध्ये पाठविले, हे खूप कौतुकास्पद आहे. नर्सिंगचे शिक्षण अत्यंत वेगळे आहे. नर्सने सर्वतोपरी परिपूर्ण असणे गरजेचे आहे. घरामध्ये नर्स हवीच पण समाजासाठी नर्स असणे गरजेचे आहे. सैनिकाप्रमाणे नर्स प्रत्येक घरातून यावी, ही समाजाला आणि देशाला गरज आहे.
नीता पंडित म्हणाल्या, नर्सिंगचा समाजात मोठा वाटा आहे. केवळ रुग्णाचा शारीरिक विकास नाही, तर मानसिक विकास देखील पाहणे गरजेचे आहे. नर्सिंग हे स्वतः साठी नाही, तर दुस-यासाठी काम करणारे वेगळे क्षेत्र आहे. रुग्णालयातून रुग्ण बाहेर जाताना नर्सने केलेले काम कधीही विसरत नाही.
प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, जगातील पहिली परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल या आधुनिक नर्सिंग आंदोलनाच्या जनक मानल्या जातात. त्यांचा जन्म १२ मे १८२० रोजी झाला. त्यांचा जन्म एका समृद्ध आणि उच्चवर्णीय कुटुंबामध्ये झाला. उच्च कुटुंबात जन्माला आलेल्या फ्लोरेन्स यांनी सेवेचा मार्ग स्वीकारला. त्या काळच्या दवाखान्यातील भयानक परिस्थितीमुळे घरच्यांचा परिचर्येसाठी विरोध होता. परिवाराचा तीव्र विरोध असताना देखील त्यांनी अभावग्रस्त लोकांच्या सेवेचे व्रत घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading