Monday, August 31, 2026
ENTERTAINMENTLatest News

पंचपिटिका रहस्याच्या पहिल्या पेटीतून कुठलं रहस्य समोर येणार ?

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत लवकरच पंचपिटिका रहस्याचा पहिल्या पेटीचं रहस्य उलगडणार आहे. येणाऱ्या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल नेत्रा आणि इंद्राणीला पंचपिटिका रहस्यातील पहिली पेटी सापडते, ती पेटी नेत्रा-इंद्राणी राजाध्यक्षांच्या घरी येऊन येतात. रूपाली ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करते. पण रुपालीला धक्का बसतो आणि ती पेटी उघडता येत नाही. अखेर नेत्रा आणि इंद्राणी त्रिनयना देवीचा ग्रंथ आणि ही पहिली पेटी त्रिनयना देवीच्याच मंदिरात ठेऊन येण्याचं ठरवतात. पण इंद्राणीचं रक्त लागून ती पेटी उघडते. आता ह्या पहिल्या पेटीत नक्की काय रहस्य दडलंय हे पाहणे रोमांचक असेल   यासाठी पाहत रहा, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading