fbpx
Thursday, December 7, 2023
BusinessLatest NewsTECHNOLOGY

लाव्हाने ‘ब्लेझ २ ५जी’ स्मार्टफोन लॉंच केला

मुंबई : बाजारात उपलब्ध इतर उत्पादनांच्या तुलनेत अत्यंत किफायतशीर दरांत नव्या युगाची वैशिष्ट्ये दाखल करण्याच्या तत्त्वज्ञानाकरिता वचनबद्ध असणाऱ्या लाव्हाने आज रू. 9,999/- पासून सुरू होणाऱ्या किंमतीत आज नवीन ब्लेझ २ ५जी सादर करण्यात येईल. हे उपकरण उत्कृष्ट ग्लास बॅकसह उपलब्ध असून हा सेगमेंटमधील पहिला रिंग लाईट ठरला. ते ग्लास ब्लॅक, ग्लास ब्ल्यू आणि ग्लास लवेंडर अशा तीन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे. (Lava launched the ‘Blaze 2 5G’ smartphone)

अत्याधुनिक स्मार्टफोनमध्ये लायटनिंग-फास्ट मीडिया टेक डायमेनसिटी ६०२० प्रोसेसर उपलब्ध आहे. ब्लेझ २ ५जी दोन वेरियंट (रॅम/रोम) – (४+४*) जीबी/ ६४ जीबी आणि (६+६*) जीबी/१२८ जीबी यूएफएस २.२ मेमरी, (१ टीबीपर्यंत विस्तार)सह उपलब्ध आहे. या उपकरणाचा १६.५५ सेमी (६.५६”) एचडी+ आयपीएस पंच होल डिस्प्ले २.५ डी कर्व्हड् स्क्रीन आणि ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे.

ब्लेझ २ ५जी स्वच्छ अँड्रॉइड टीएम १३ सह उपलब्ध असून त्यात कोणत्याही एडीएस तसेच ब्लॉटवेअर नाही. शिवाय अनोळखी कॉल आल्यास ऑटो कॉल रेकॉर्डिंग आणि साईड फिंगरप्रिंट सेन्सरची सोय त्यात आहे. हे उपकरण अँड्रॉइड १४ अपग्रेडचे वचन देते, सोबतच दोन वर्षे तिमाही सिक्युरिटी अपडेटही मिळते.

ब्लेझ २ ५जी परिपूर्ण सेल्फीसाठी स्क्रीन फ्लॅशसह ५० एमपी रिअर कॅमेरा आणि ८ एमपी फ्रंट कॅमेरासह सुसज्ज आहे. स्मार्टफोनच्या इनबिल्ट कॅमेरा वैशिष्ट्यांमध्ये फिल्म, स्लो मोशन, टाइमलॅप्स, यूएचडी, जीआयएफ, ब्युटी, एचडीआर, नाईट, पोर्ट्रेट, एआय, प्रो, पॅनोरमा, फिल्टर आणि इंटेलिजेंट स्कॅनिंग यांसारख्या विविध पर्यायांचा समावेश आहे. ब्लेझ २ ५जी हा ५००० एमएएच बॅटरी आणि १८ व्हॉट्स फास्ट चार्जिंग (टाईप-सी) सह येतो. ग्राहकांच्या विक्रीनंतरच्या उत्कृष्ट अनुभवासाठी, ग्राहकांना ‘घरपोच मोफत सेवा’ प्रदान केली जाईल.

Leave a Reply

%d