ईगल्स् क्रिकेट अॅकॅडमी, विजय क्रिकेट अॅकॅडमी संघांचे सलग विजय !!
पुणे : जोशी स्पोर्ट्स तर्फे आयोजित पहिल्या ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ टी-२० क्रिकेट स्पर्धेत ईगल्स् क्रिकेट अॅकॅडमी संघाने सलग तिसरा तर, विजय क्रिकेट अॅकॅडमी संघाने सलग दुसरा विजय मिळवत स्पर्धेत आगेकूच केली.
सनसिटी रोड येथील व्हिजन क्रिकेट अॅकॅडमी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अक्षयकुमार यादव याच्या ९४ धावांच्या जोरावर विजय क्रिकेट अॅकॅडमीने शिवनेरी इलेव्हन संघाचा १०२ धावांनी सहज पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना विजय क्रिकेट अॅकॅडमीने २०९ धावांचा डोंगर उभा केला. अक्षयकुमार यादव याने ५६ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह ९४ धावांची खेळी केली. यासोबत नितीश कुकडेजा याने ५६ धावांची खेळी केली. या आव्हानासमोर शिवनेरी इलेव्हनचा डाव १०७ धावांवर संपुष्टात आला.
संदीप शिंदे याच्या ८३ धावांच्या जोरावर ईगल्स् क्रिकेट अॅकॅडमीने सिंहगड इलेव्हनचा १०१ धावांनी सहज पराभव करून विजयाची हॅट्ट्रीक नोंदविली. ईगल्स् क्रिकेट अॅकॅडमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना २४२ धावांचा डोंगर उभा केला. संदीप शिंदे याने ३६ चेंडूत ५ चौकार आणि ९ षटकारांसह ८३ धावांची खेळी केली. पलाश कोंढारे (४३ धावा) आणि स्वप्निल शिंदे (४३ धावा) यांनीही दुसर्या बाजूने उत्तम साथ दिली. या लक्ष्याचा पाठलाग करताना सिंहगड इलेव्हनचा डाव १४१ धावांवर मर्यादित राहीला. शिवा धनगर (४८ धावा) आणि प्रशांत लाब (४८ धावा) यांनी धावांचे योगदान दिले.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
विजय क्रिकेट अॅकॅडमीः २० षटकात ४ गडी बाद २०९ धावा (अक्षयकुमार यादव ९४ (५६, १० चौकार, ३ षटकार), नितीश कुकडेजा ५६ (३७, ५ चौकार, १ षटकार), हेमंत राठोड १-२) वि.वि. शिवनेरी इलेव्हनः १८.५ षटकात १० गडी बाद १०७ धावा (संदीप सुरवसे ४२, शुभम नायडू १७, प्रसन्न हजारे २-७, भुषण पाटील २-१०); सामनावीरः अक्षयकुमार यादव;
ईगल्स् क्रिकेट अॅकॅडमीः २० षटकात ५ गडी बाद २४२ धावा (संदीप शिंदे ८३ (३६, ५ चौकार, ९ षटकार), पलाश कोंढारे ४३, स्वप्निल शिंदे ४३, निरंजन कदम नाबाद २८, झिशान अहमद २-४०) वि.वि. सिंहगड इलेव्हनः २० षटकात ९ गडी बाद १४१ धावा (शिवा धनगर ४८, प्रशांत लाब ४८, संकेत हांडे ३-३२, फैझ शेख २-७); सामनावीरः संदीप शिंदे;
