Wednesday, September 2, 2026
BusinessLatest News

बेलराइज इंडस्ट्रीज लि.च्या सह- संस्थापक आणि कार्यकारी संचालक सुप्रिया एस. बडवे इनफ्लुएन्शियल लीडर्स ऑफ इंडिया २०२३ पुरस्काराने सन्मानित

पुणे : सुप्रिया एस. बडवेकार्यकारी संचालक, बेलराइज इंडस्ट्रीज लि. यांना इनफ्लुएन्शियल लीडर्स ऑफ इंडिया २०२३ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिसऱ्या वर्षात असलेले इनफ्लुएन्शियल लीडर्स ऑफ इंडिया पुरस्कार बदलाचे प्रवर्तक ठरणाऱ्यांच्या कामाचा सन्मान करतात.

बेलराइज इंडस्ट्रीज लि.च्या सह- संस्थापक आणि कार्यकारी संचालक  सुप्रिया एस. बडवे म्हणाल्या, ‘इनफ्लुएन्शियल लीडर्स ऑफ इंडिया २०२३ पुरस्काराने सन्मानित झाल्याचा मला आनंद झाला आहे. जागतिक स्तरावर भारताची दखल घेतली जाण्याची वेळ आली आहे आणि भारतीय उद्योजकांनी हा क्षण साजरा करणे आवश्यक आहे. मला विश्वास वाटतो, की अशाप्रकारचे पुरस्कार नव्या स्त्री उद्योजकांना प्रेरणा देतील व त्या मेक इन इंडिया चळवळीसाठी भरीव योगदान देतील. असा प्रकारचे पुरस्कार आमच्या अनोख्या व्यवसाय पद्धतीची, आमचे एमओएटी आणि जिंकण्याचा हक्क यांची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी देतात.’ त्या पुढे म्हणाल्या, ‘इनफ्लुएन्शियल लीडर्सचा भर वास्तविक गरजांवर असतो आणि ते योग्य प्रकारे कंपन्यांना नव्याने आकार देत आहेत. समाजाच्या गरजा पूर्ण करून भारताला सक्षम करणाऱ्या नव्या धोरणात्मक व्हिजनपासून कृतीपर्यंत नेण्यासाठी ते झटत आहेत. भारताला अशाप्रकारच्या जास्तीत उद्योजकांची आणि त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला सेवा देण्यासाठी आवश्यकता आहे.’

सुप्रिया एस. बडवे या बहुगुणी व्यावसायिक असून त्यांनी आपले प्रवर्तकीय वैशिष्ट्यवैचारिक लीडर आणि इनोव्हेटर गुणधर्म तसेच ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स उत्पादन क्षेत्राचे नेतृत्व करण्याची आपली क्षमता दाखवून दिली आहे. त्यांच्या असामान्य शैक्षणिक कामगिरीमध्ये विदर्भ महाविद्यालय अमरावती येथून पदवीचा (एमएससी फिजिक्स) समावेश आहे. व्यावसायिक नियोजनदर्जा व्यवस्थापन यंत्रणा आणि मनुष्यबळ या क्षेत्रात त्यांचे विशेष कौशल्य आहे.

बेलराइज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने त्यांना तीन जेआयपीएम पुरस्कार मिळाले असून स्त्री उद्योजक या नात्याने डीडी सह्याद्रीवर त्यांची मुलाखत झाली आहे. त्यांना रोटरी व्होकेशनल पुरस्कारही मिळाला आहे. त्या रोटरी ई- क्लब ऑफ ई- डायमंडच्या चार्टर प्रेसिडेंट आहेत.

बेलराइज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावण्याबरोबरच त्यांनी इतर छंद व व्यावसायिक आवडी जोपासल्या आहेत. त्यांचा स्पोर्ट्सइंडी (संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी) हा सोशल प्लॅटफॉर्म क्रीडाप्रेमींना एकत्र आणतो, तर झारा फ्लॉवर फुलशेतीमध्ये कार्यरत आहे. निसर्गप्रेमी असलेल्या त्या २००७ मध्ये फुलशेतीकडे आकर्षित झाल्या. पुण्यातील हॉर्टीकल्चर ट्रेनिंग सेंटरमधून त्यांनी फ्लोरीकल्चर डेव्हलपमेंटचा प्रमाणित अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी आपले स्वतःचे फ्लोरीकल्चर युनिट – झाराफ्लॉवर्सची स्थापना करत नवा प्रवास सुरू केला. ही बेलराइज इंडस्ट्रीज लिमिटेडची असोसिएट कंपनी आहे. यावरून इनफ्लुएन्शियल लीडर आणि मार्गदर्शक म्हणून त्यांचे बहुगुणी आमि सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व दिसून येते.

सौ. सुप्रिया बडवे यांना मिळालेल्या पुरस्काराचे प्रसारण एका नामवंत बिझनेस चॅनेलवर करण्यात आले असून तिथे त्यांनी कशाप्रकारे अडथळे आणि प्रतिकूलता औद्योगिक प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहेत याविषयी आपले मत व्यक्त केले. हा व्हिडिओ सार्वजनिक व्यासपीठावर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading