Friday, September 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुण्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाच लाक्षणिक उपोषण

पुणे : मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत . दरम्यान मराठवाड्यातील बीड, हिंगोली ,परभणीसह  महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलने होत आहेत आज पुण्यातील कोंढवा परिसरात दि मुस्लिम फाऊंडेशनच्या वतीने लाक्षणिक उपोषण करुन ,संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक गफूर पठाण यांच्या नेतृत्त्वाखाली मुस्लिम समाजातील नागरिक यांनी मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला .यावेळी पुणे शहरातील मुस्लिम समाजाचे युवक मोठ्या संखेने सहभागी झाले होते .
एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्कच नाही कोणाच्या बापाच अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
यावेळी गफूर पठाण म्हणाले की, मागील सहा दिवसापासुन मराठा आरक्षणासाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहे.मात्र त्यावर राज्य सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका मांडताना दिसत नाही.त्या पार्श्वभूमीवर आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे,या मागणीसाठी आज लाक्षणिक उपोषण करीत आहे.राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा,अन्यथा आणखी अधिक तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
या आंदोलनाचे नेतृत्व मुस्लिम फाउंडेशन चे संस्थापक हाजी गफूर पठाण यांनी केले होते यावेळी इम्तियाज शेख ,समीर शेख ,ओबेद शहा ,नदीम शेख मुज्जू शेख ,महम्मदिन खान ,बापू मुलाणी ,राजू आडगळे ,शाहबाज पंजाबी ,मुनाफ मामू शाखीर शेख संजय लोणकर गणेश भोईते ,नरेश बनसोडे,इक्बाल मुलाणी ,राज अहमद, जावेद शेख ,मुबिन शेख ,शाहिद शेख यासह पुणे शहरातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येंने उपस्थित होता .

 

One thought on “पुण्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाच लाक्षणिक उपोषण

  • मराठा समुदाय आंदोलन को शुभकामनाएँ!

    Reply

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading