अंबाईमाता देवस्थानची निराधार, वंचित मुलांना मदतीचा हात
पुणे:धायरी येथील शिवकालीन श्री अंबाईमाता देवस्थानच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या खर्चात बचत करुन शिल्लक अन्नधान्य , जीवनावश्यक वस्तू व साहित्याची मदत वंचित निराधार, तसेच विशेष मुलांना देण्यात आली.
माळेगाव ( ता. भोर ) येथील निराधार माऊली आश्रम व धायरी येथील ज्ञानगंगोत्री मुकबधीर,मंदीमंद मुलांच्या निवासी शाळेला तांदूळ,तेल ,डाळींसह जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य भेट देण्यात आले.
माऊली आश्रमाचे प्रमुख
ह.भ.प.नवनाथ लिम्हण व ज्ञानगंगोत्री शाळेचे प्रमुख व्हि.एल.कसबे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी अनोख्या मदतीने भारावून गेले.
देवस्थानचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले, दोन्ही आश्रमातील निराधार, विशेष मुलांना सहा महिने पुरेल इतके अन्नधान्य भेट देण्यात आले. नवरात्र उत्सवाचा थाटमाट न करता खर्चात बचत करुन शिल्लक धान्य, वस्तू दरवर्षी उपेक्षित वंचित समाजासाठी देण्यात येत आहेत.
यावेळी देवस्थानचे सचिव विश्वजीत उर्फ भाऊसाहेब कामठे ,कार्याध्यक्ष चंद्रकांत वांजळे ,चंद्रकांत एकनाथ पोकळे, बाळासाहेब कामठे ,हिरामण पोकळे बाजीराव चौधरी , मदन भोसले,सोपानराव लायगुडे, धनंजय पोकळे ,किरण रमेश पोकळे, अरविंद शंकर पोकळे ,सागर चंद्रकांत पोकळे ,अनिल दत्तात्रेय पोकळे, भिकाजी कोकाटे ,शिवलिंग सुभाष पोकळे ,अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.
