पुणे डॉक्टर असोसिएशनच्या वतीने तेजोमय 2023 बाल आरोग्य दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
पुणे : पुणे डॉक्टर असोसिएशनच्या वतीने तेजोमय 2023 बाल आरोग्य विशेषांक दिवाळी अंक प्रकाशन सोहळा आयएमए हॉल टिळक रोड येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.याप्रसंगी टिळक रोड ते आयएमए हॉल पर्यंत आरोग्य दिंडी काढून डॉक्टरांनी समाजसुधारकांची वेशभूषा परिधान करून सामाजिक संदेश देखील दिला. (Publication of Tejomay 2023 Child Health Diwali Special Issue by Pune Doctors Association)
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे भारती विद्यापीठ डायरेक्टर डॉ. अस्मिता जगताप, माजी अध्यक्ष मराठी साहित्य संमेलन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते तेजोमय 2023 बाल आरोग्य विशेषांक दिवाळी अंक प्रकाशन सोहळा पार पडला .
याप्रसंगी कार्यक्रमाला डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ. राज लवंगे,उपाध्यक्ष डॉ. डी. बी. शिंदे, सचिव डॉ.दीपाली वाघ, खजिनदार डॉ.सचिन लकडे ,सहसचिव डॉ.स्वप्नाली वाडेकर,सहखजिनदार डॉ.अश्विनी घोडके,नियोजित अध्यक्ष डॉ.सचिन केदार व डॉक्टर असोसिएशनचे सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
