टॅलीएज या टॅली सोल्युशन्सच्या अकाउंट ऍग्रीगेटर उपकंपनीला मिळाली आरबीआयची मान्यता
मुंबई : टॅली सोल्युशन्स या भारतातील आघाडीच्या बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेयर कंपनीने टॅली अकाउंट ऍग्रीगेटर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तिच्या टॅलीएज या उत्पादनासह लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. फायनान्शियल इन्फॉर्मेशन युजर्स (एफआययू) आणि फायनान्शियल इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर्स (एफआयपी) म्हणून देखील ओळखल्या जाणाऱ्या बँका आणि एनबीएफसींसोबत काम करून लाखो भारतीयांना कर्ज तसेच इतर आर्थिक सेवा सहजपणे उपलब्ध करवून देण्यात मदत करावी हा यामागचा उद्देश आहे.
भारतात ६४० लाखांहून जास्त सूक्ष्म, लघु, मध्यम व्यवसाय आहेत. यापैकी बहुतांश व्यवसायांना आणि कित्येक लाखो व्यक्तींना पत पार्श्वभूमी, कागदपत्रे उपलब्ध नसणे आणि कमजोर आर्थिक पार्श्वभूमी यामुळे औपचारिक कर्ज व इतर आर्थिक सेवा मिळू शकत नाहीत. इतकेच नव्हे तर, अशा सेवांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत देखील कागदपत्रे सादर करण्याचा त्रास, विलंब आणि माहिती गोपनीय न राखली जाणे अशा बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. एका आर्थिक सेवा कंपनीने नुकत्याच प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, भारतात ६४० लाख सूक्ष्म, लघु, मध्यम व्यवसायांपैकी फक्त १४% व्यवसायांना क्रेडिट उपलब्ध होते. व्यवसाय तसेच व्यक्ती या दोघांसाठी देखील औपचारिक क्रेडिटपर्यंतची पोहोच, संपत्ती व्यवस्थापन आणि व्यक्तिगत आर्थिक व्यवस्थापन यांच्यातील कमतरता दूर करणे गरजेचे असल्याचे यावरून दिसून येते. टॅलीएजमध्ये युजर्सना विविध आर्थिक कंपन्यांकडून स्वतःची सर्व आर्थिक माहिती सहजपणे एकाच ठिकाणी एकत्रित करून ठेवता येते, ही माहिती फक्त संमती असेल तरच, अतिशय सुरक्षितपणे पाहता किंवा शेयर करता येते.
एनबीएफसी-एए लायसेन्सच्या फ्रेमवर्कअंतर्गत काम करणाऱ्या टॅलीएजमध्ये डिजिटल डेटा ऍक्सेस आणि आर्थिक संस्थांसोबत संमतीनुसार डेटा शेयरिंग १००% सुरक्षित असते. एन्ड-टू-एन्ड डेटा एन्क्रिप्शन्स आणि डिजिटल सिग्नेचर्स यामुळे असुरक्षिततेला अजिबात वाव उरत नाही. टॅलीएजमध्ये युजर्सचे त्यांच्या डेटा फ्लोवर संपूर्ण नियंत्रण असते. डेटा शेयरिंगची कोणतीही विनंती ते स्वतःच्या मतानुसार मंजूर करू शकतात, नाकारू शकतात, थांबवू किंवा मागे घेऊ शकतात.
या घोषणेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना, टॅली सोल्युशन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर तेजस गोएंका यांनी सांगितले, “टॅलीमध्ये आम्ही आमचे अकाउंट ऍग्रीगेटर सोल्युशन टॅलीएज तयार केले आहे, युजर्सना त्यांच्या डेटावर संपूर्ण नियंत्रण ठेवता यावे हा यामागचा उद्देश आहे. टॅलीएजसोबत युजर्सचा डेटा १००% सुरक्षित राहावा यासाठी आम्ही विशेष काळजी घेतली आहे, आम्हाला युजर्सचा डेटा कधीही, कोणत्याही ठिकाणी वाचता किंवा स्टोर करून ठेवता येत नाही. नवीन ग्राहक विभागांपर्यंत पोहोचण्यासाठी, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी नवी उत्पादने, आर्थिक सेवा तयार करण्यासाठी आम्ही एफआययुसोबत देखील सहयोग करत आहोत.
सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रात व्यवसाय व्यवस्थापन सॉफ्टवेयर विभागात टॅलीचे आघाडीचे स्थान सूक्ष्म, लघु, मध्यम व्यवसायांकडून टॅलीने संपादन केलेला विश्वास दर्शवते. एए नेटवर्क वाढत असल्याने टॅलीचे पदार्पण या इकोसिस्टिमच्या उभारणीत व विस्तारामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.”
आर्थिक तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे कर्ज इकोसिस्टिममध्ये परिवर्तन घडून आले असले तरी आर्थिक सेवांची उपलब्धता हे लघु व्यावसायिकांसाठी अद्याप देखील एक आव्हानच आहे. एनपीएमध्ये होत असलेली वाढ आणि कर्जासाठी येणाऱ्यांची आर्थिक स्थिती तपासण्यात येणाऱ्या अडचणी यामुळे बँकांसाठी देखील लघु उद्योजकांना कर्ज पुरवठा करणे कठीण आहे. अकाउंट ऍग्रीगेटरमुळे या कमतरता भरून निघतील अशी अपेक्षा आहे.
बँका, एनबीएफसी, जीएसटीएन, विमा कंपन्या, पेमेंट बँका आणि इतरांसोबत सहयोग आणि भागीदारीच्या माध्यमातून टॅलीएज काम करेल अशी योजना आहे. भारतीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग आणि व्यक्तींना स्वतःची आर्थिक माहिती आर्थिक संस्थांसोबत सर्वात सहजसोप्या, सर्वात स्मार्ट आणि सर्वात सुरक्षित पद्धतीने एकत्रित करून ठेवता यावी, स्वतःच्या परवानगीने शेयर करता यावी हे सुनिश्चित करणे हा यामागचा उद्देश आहे.
