निलेश राणे राजकारणातून घेणार संन्यास?
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकारणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.
त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकारणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिले, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भाजपमध्ये खूप प्रेम भेटले आणिभाजपसारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे.
मी एक लहान माणूस आहे पण राजकारणात खूप काही शिकायला मिळाले आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणे वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वत:चा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही.
