स्टार हेल्थने पाच महिन्यांमध्ये पुण्यात १५८ कोटी रुपयांचे क्लेम्स सेटल केले
पुणे : भारतातील आघाडीची स्टॅन्डअलोन हेल्थ इन्शुरन्स कंपनी, स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सने एप्रिल २०२३ ते ऑगस्ट २०२३ या पाच महिन्यांमध्ये पुण्यात एकूण १५८ कोटी रुपयांचे क्लेम्स सेटल करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यामध्ये १४० कोटी रुपयांचे कॅशलेस क्लेम सेटलमेंट्स आणि जवळपास १८ कोटी रुपयांचे रीएम्बर्समेंट क्लेम्स आहेत. ग्राहकांचे समाधान आणि आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्याप्रती कंपनीची वचनबद्धता यामधून अधोरेखित होते.
एप्रिल २०२३ ते ऑगस्ट २०२३ पर्यंत स्टार हेल्थने पुण्यामध्ये २७७०० पेक्षा जास्त इंडिविज्युअल क्लेम्सच्या रकमा अदा केल्या, यामध्ये २३२०० पेक्षा जास्त कॅशलेस मोड आणि ४४०० पेक्षा जास्त रीएम्बर्समेंट क्लेम्स होते. कंपनीने सर्व कॅशलेस क्लेम्स २ तासांत सेटल केले. बहुतांश केसेसमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट्सचे सुरुवातीचे ऑथोरायझेशन २ तासांमध्ये दिले गेले. रीएम्बर्समेंट क्लेम्सच्या रकमा क्लेम दाखल केल्यानंतर ७ दिवसांच्या आत अदा करण्याचा प्रयत्न स्टार हेल्थ कंपनी करते, जेणेकरून ग्राहकांना रीएम्बर्समेंटमार्फत देखील सेटलमेंटमध्ये कोणताही त्रास सहन करावा लागत नाही.
स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ स्ट्रॅटेजी अँड इन्व्हेस्टर रिलेशन्स ऑफिसर आदित्य बियानी यांनी सांगितले, “आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, पुण्यामध्ये स्टार हेल्थने क्लेम्स सेटल करण्याचे आणि कॅशलेस ट्रीटमेंट्सना मंजुरी देण्याचे काम अतिशय वेगाने केले आहे. या भागातील ग्राहकांच्या सेवेप्रती आम्ही बांधील आहोत. आमच्या ग्राहकांच्या आरोग्य सुरक्षा गरजा पूर्ण करणारी, नाविन्यपूर्ण उत्पादने डिझाईन करणे असो किंवा क्लेम व्यवस्थापनामार्फत असो, आम्ही आमच्या ग्राहकांना नेहमीच सर्वोत्कृष्ट अनुभव प्रदान करण्याचा प्रयत्न करतो. शहरात आम्ही आपले हॉस्पिटल नेटवर्क मजबूत करणे सुरु ठेवले आहे, जेणेकरून आमचे ग्राहक आपल्या घराजवळील हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट्स घेऊ शकतील.”
स्टार हेल्थने पुण्यामध्ये रिटेल हेल्थ इन्शुरन्समार्फत २.५३ लाखांपेक्षा जास्त आणि ग्रुप हेल्थ इन्शुरन्समार्फत १०००० लोकांना विमा संरक्षण दिले आहे. १४ ब्रांच ऑफिसेस आणि १९६०० पेक्षा जास्त एजेंट्सच्या मजबूत नेटवर्कसह ही कंपनी या क्षेत्रातील आपल्या ग्राहकांना सहज पोहोच आणि वेळेवर सहायता प्रदान करत आहे. ऑगस्ट २०२३ च्या आकडेवारीनुसार, पुण्यामध्ये स्टार हेल्थच्या नेटवर्कमध्ये ७७७ हॉस्पिटल्स आहेत, जिथे पॉलिसीधारकांना कॅशलेस हॉस्पिटलायजेशन सुविधा मिळते.
देशभरात ७७.५४ लाख व्यक्ती या कंपनीच्या कव्हरेजचा लाभ घेत आहेत. ६.५८ लाख एजंट्स, ८७९ ब्रांच ऑफिसेस आणि १८९९३ नेटवर्क हॉस्पिटल्सच्या नेटवर्कसह ही कंपनी सहज उपलब्ध होण्यायोग्य, दर्जेदार आरोग्य देखभाल सेवा पुरवते. याखेरीज स्टार हेल्थ एआय आणि एमआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्राहक सेवेमध्ये प्रगती घडवून आणते, ग्राहकांच्या शंका, प्रश्न निवारणासाठी लागणारा वेळ कमी करते आणि अखंडित व कार्यक्षम अनुभव प्रदान करते.
बियानी पुढे म्हणाले, “आम्ही जे क्लेम्स हाताळतो त्यांचे सखोल विश्लेषण करताना आम्हाला एक समस्या सर्वत्र आढळून आली ती म्हणजे पॉलिसीधारकांना आपले इन्शुरन्स कव्हरेज, पॉलिसीचे अतिरिक्त लाभ आणि पॉलिसीच्या इतर महत्त्वपूर्ण पैलूंबाबत पुरेशी माहिती नाही. ही वाटचाल कठीण आहे पण आम्ही आमच्या ग्राहकांमध्ये योग्य जागरूकता आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
अधिक जागरूक राहिल्यामुळे स्टार हेल्थच्या ग्राहकांना अनेक लाभ मिळतात, यामध्ये २४X७ टेलिमेडिसिन सेवा, हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागू नये यासाठी आरोग्याला प्रोत्साहन देणारे वेलनेस प्रोग्राम, मोफत वार्षिक आरोग्य तपासण्या आणि इतर अनेक लाभ आहेत. स्टार हेल्थच्या ऍपमार्फत संपूर्ण देशभरात हे लाभ मिळू शकतात, यामध्ये डॉक्टर कन्सल्टेशनसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा देखील समावेश आहे, ज्यामुळे प्रगत व सक्षम आरोग्य देखभाल अनुभव मिळतो.
