ज्येष्ठ अभ्यासक चंद्रकांत वानखडे यांना इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार
समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर (डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले गुरू) पुरस्कार ज्येष्ठ लेखक,संपादक,विचारवंत, ‘गांधी का मरत नाही’ या बहुचर्चित ग्रंथाचे लेखक चंद्रकांत वानखडे यांना जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये, स्मृती चिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून डिसेंबर मध्ये मुंबई येथे होणाऱ्या समाज साहित्य संमेलनात सदर पुरस्काराने श्री वानखडे यांना गौरविण्यात येणार आहे.
या पुरस्कार योजनेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस, समीक्षक प्रा.डॉ.नितीन रिंढे, प्रा.डॉ.रणधीर शिंदे यांनी काम पाहिले. यापूर्वी हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांना प्राप्त झाला होता . चंद्रकांत वानखडे यांचे समाज साहित्य परिवारातर्फे मनापासून अभिनंदन!
