Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

सुरेखा पुणेकर यांच्या ठसकेबाज लावण्यांनी जिंकली रसिकांची मने

पुणे लोकमान्य फेस्टीव्हलमध्ये नवरात्र महोत्सवात सुप्रसिध्द लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर प्रस्तुत नटरंगी नार या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या लावणी कार्यक्रमात पारंपारिक पद्धतीने लावण्यांचे सादरीकरण झाले. नखशिखांत वेशभूषेत एकापेक्षा एक सरस लावण्यांचे सादरीकरण झाले. महिलांनी जागेवर उभे राहून लावण्यांना दाद दिली. नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्या वाजविल्या. सर्वसामान्य, घरंदाज महिलांनीही लावण्यांचा मनमुराद आनंद लुटला. काही लावण्यांचा ‘वन्समोअर’ही झाला. या लावणीच्या कार्यक्रमाला लहानांपासून थोरांपर्यंत रसिक प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसाद मिळाला. लोकमान्यनगर येथील गार्डन गर्दीने खचाखच भरले होते.

यावेळी ‘पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा, नाद खुळा नाद खुळा, या रावजी बसा भाऊजी, तुम्हावर केली मी मर्जी बहाल अशा अजरामर मराठी लावण्या सादर करण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन पुणे लोकमान्य फेस्टीवलचे संस्थापक-अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते, उत्सवाचे अध्यक्ष डॉ. नरेश मित्तल यांनी केले होते.

संयोजन महेश महाले, शुभांगी सातपुते, अदित्य सातपुते, गौरव सैतवाल, ऋषीकेश भोसले, चेतन सोनवणे, सारंग कुलकर्णी, रुदवेक ढोकळे, अजय राजवाडे, निता ससाणे,  निता परदेशी आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading