Wednesday, June 17, 2026
Latest NewsSports

खेलो इंडीया ‘वुमेन्स लीग’ रोड सायकल स्पर्धेत रीया पटेल, अपूर्वा गोरे, योगेश्वरी कदम क्रीतीका तोरवे यांनी पटकावले सुवर्णपदक

पुणे :  क्रीडा स्पर्धामधील सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या ‘वुमेन्सच्या लीग’ योजने अंतर्गत सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने बारामती येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत गुजरातच्या रीया पटेल आणि महाराष्ट्रच्या सांगलीच्या योगेश्वरी कदम आणि अहमदनगच्या अपूर्वा गोरे यांनी आपापल्या वयोगटात सुवर्णपदक पटकावले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर आज सकाळी शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. शर्मिलाताई पवार यांच्या हस्ते या स्पर्धचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी साई च्या खेलो इंडीया योजनेचे सह संचालक नरेंद्र सिंग उज्वल, व्हॉलीबॉलची राष्ट्रीय खेळाडू आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सिया पाटील, बारामतीच्या नगराध्यक्षा सौ. पूर्णिमाताई तावरे, सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, स्पर्धा संचालिका दिपाली पाटील, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव प्रा. संजय साठे आदी मान्यवर हजर होते.
आज झालेल्या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे-
सब ज्युनिअर गर्ल्स १० किमी टायम ट्रायल –  सुवर्ण – रीया पटेल (गुजरात १६मि १९.०५ से.), रौप्य – श्रावणी परीट (महाराष्ट्र – १६ मी. २२.५९ से.), कांस्य श्रावणी कासार (महाराष्ट्र -१७ मी. २२.७१ से.)
ज्युनिअर गर्ल्स १० किमी टाईम ट्रायल – अपूर्वा गोरे (महाराष्ट्र १५ मि. ५२.४८१) रौप्य – स्नेहल माळी (महाराष्ट्र १५ मी. ५८.११५से.), कांस्य – अंजली पाटील (महाराष्ट्र १६ मी ४७.१३२ से)
वुमेन इलीट २० किमी टाईम ट्रायल – सुवर्ण -योगेश्वारी कदम ( महाराष्ट्र ३४ ता ११.४८४से), रौप्य – प्रिया दबालीया (महाराष्ट्र ३४.११ मी. ४८४ से.), कांस्य – राधिका दराडे ( महाराष्ट्र  २५.०६.४०८)
सब ज्युनिअर गर्ल्स – ५ किमी मास स्टार्ट इंडीयन बाईक्स – क्रीतीका थोरवे, सेवरै भागवत आणि वैष्णवी शिंदे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading