सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आपत्ती निवारण दिवस साजरा
पुणे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय छात्र सेना युनिट आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी अपत्ती निवारण दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. कॅप्टन चितळे यांच्या हस्ते पथकाचे सत्कार करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे निरिक्षक ब्रजेश राईकवार यांनी एनडीआरएफच्या मदत कार्याची तसेत तत्वांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. तसेच एनडीआरएफच्या पुण्यातील पथकाने आपत्तीवेळी करावयाचे सामान्य प्रथमोपचार, सीपीआर, पीडित वाहतूक तंत्र, अग्निशमन प्रात्याक्षित, पूर संरक्षण पद्धती इत्यादींचे प्रात्याक्षितही यावेळी दिले. या कार्यक्रमात विद्यापीठाचे लेफ्ट. आशिष सांगळे,, सुकाणू समिती सदस्य हरीश नवले, एनसीसी कॅडेट आणि विद्यापीठातील विद्यार्थी उपस्थित होते.
