पीएमपीएमएल च्या सर्व सेवक व अधिकारी यांची ‘Location Base क्युआर कोड’ द्वारे हजेरी.
‘Location Base क्युआर कोड’ मोबाईल अॅप मध्ये स्कॅन करून होणार उपस्थितीची नोंद.
प्रवाशी नागरिकांना योग्य व खात्रीशीर सेवा मिळण्यासाठी सर्व कार्यालये व डेपोमध्ये
सुरुवात.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
सचिन्द्र प्रताप सिंह यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून अनेक उपाययोजना व अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविलेले आहेत. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक . सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सेवकांनी व अधिकाऱ्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या वेळेतच उपस्थित राहून महामंडळाच्या कामकाजाच्या सोईच्या दृष्ठीने, प्रवाशांना योग्य व खात्रीशीर सेवा देण्याच्या दृष्ठीकोनातून ‘Location Base क्युआर कोड’ द्वारे हजेरीची नोंद महामंडळाच्या सर्व कार्यालये व डेपोमध्ये सुरु करण्यात आली आहे.
महामंडळाने कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी तयार केलेल्या ‘RTMS कार्गो एफएल’ मोबाईल अॅप मध्ये महामंडळातील सर्व सेवक व अधिकारी यांनी कामावर हजर होते वेळी दैनिक हजेरी या सदराखाली कामावर येण्याचा वेळेस व कामाची सुट्टी झाल्यावर जाण्याच्या वेळेस सर्व कार्यालयाच्या व सर्व डेपोच्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेले ‘Location Base क्युआर कोड’ स्कॅन करून उपस्थितीची नोंद करावयाची आहे. त्या नोंदी नुसार सर्व सेवक व अधिकारी यांचे पगार अदा करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना योग्य व खात्रीशीर सेवा मिळणार आहे.
