Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने

पुणे : महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) ने वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रलंबित प्रश्नां बाबतीत संघटनेने 1 नोव्हेंबर 2023 रोजी मंत्रालय मुंबई येथे मोर्चा चा निर्धार केला आहे, तसेच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दि 16 आक्टोबर 2023 रोजी रोजी मा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे लाक्षणिक निदर्शने करून पुणे जिल्हा मधील सर्व कंत्राटी कामगारांनी एकजुटीने 1 नोव्हेंबर च्या मोर्चा मध्ये सहभागी होवून न्याय हक्कांच्या करिता सहभागी व्हावे असे आवहान महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे पुणे जिल्हा सेक्रेटरी निखिल टेकवडे व अध्यक्ष सुमीत कांबळे यांनी केले आहे.
या संघटनेच्या मागण्या बाबतीत निवेदन मा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे च्या वतीने निवासी जिल्हाअधिकारी श्रीमती ज्योती कदम यांनी स्विकारून सरकार कडे पाठविण्याचे आस्वासन दिले आहे, या वेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपमहामंत्री राहूल बोडके, संघटनमंत्री उमेश आणेराव, मार्गदीप मस्के, संघटनेचे पुणे अध्यक्ष सुमीत कांबळे सेक्रेटरी निखिल टेकवडे शिष्टमंडळात सहभागी होते.

महत्वपूर्ण मागण्या

1) राज्यातील महावितरण, महापारेषण, व महानिर्मिती कंपनीतील नियमित मंजूर रिक्त पदांवर मागील 15 ते 20 वर्षेपासून फक्त 14हजार, 15 हजार रूपये प्रति माहे काम करत असलेल्या अनुभवी व कुशल वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजंदारी पद्धतीने वयाच्या 60 वर्षा पर्यंत जॉब सिक्युरिटी देऊन सेवेत सामावून घ्यावे .
2) समान काम समान वेतन द्यावे

3) संविधानिक शासकीय देय रकमेचा अपहार करणाऱ्या व कामगारांचे आर्थिक शोषण करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे.

4) अन्याय ग्रस्त कामगारांना कामावर घ्यावे .
5) प्रलंबित धोरणात्मक निर्णय होईपर्यंत या कामगारांना प्रति माहे रू 20,000 पगार वाढ देण्यात यावी.

6) सध्या कार्यरत असलेल्या कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करून कंत्राटी कामगार पध्दत बंद करण्यात यावी. ई मागण्या बाबतीतील निवेदन महाराष्ट्र राज्य व मा उर्जा मंत्री यांना देण्या करिता मा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या कडे सुपूर्द केले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading