वी च्या नव्या कॅम्पेनमध्ये सर्वांना ‘बी समवन्स वी’ बनण्याचे आवाहन;
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. मानवजातीच्या उत्क्रांतीचा आलेख पाहिला तर दिसून येते की, जगण्याच्या आणि प्रगती करण्याच्या संपूर्ण वाटचालीत माणसांनी एकमेकांची साथसोबत कायम जपली. पण सध्याच्या जगात दोन प्रकारची आव्हाने निर्माण झालेली आहेत. विविध संशोधने आणि अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधील व्यक्ती, खासकरून जेनझेड आणि मिलेनियल्सना एकलकोंडेपणासारखी आव्हाने भेडसावत आहेत आणि सामाजिकदृष्ट्या एकटे पडण्याची भीती त्यांच्या एकंदरीत कल्याणावर विपरीत प्रभाव पाडत आहे. मोठ्या प्रमाणावर फिजिटल बनत चाललेल्या आपल्या सध्याच्या जगात अस्सल भावनिक कनेक्शन्स जोडले जाणे निकडीचे असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागलेले आहे.
एक आघाडीची टेलिकॉम कंपनी वी ने भौतिक व डिजिटल या दोन्ही जगांमधील सर्वोत्तम घटकांचा संगम साधून ‘बी समवन्स वी‘ हे आपले नवे क्रिएटिव्ह कॅम्पेन तयार केले आहे. भावनिक आव्हान करणारे हे कॅम्पेन आपल्या ग्राहकांचे सहयोगी बनण्याच्या, अधिक चांगले वर्तमान आणि अधिक उज्वल भवितव्य निर्माण करण्याच्या वी च्या व्हिजनला साजेसे आहे. परिस्थिती अनुकूल असो वा आव्हानात्मक, एकमेकांना साथ व पाठिंबा देत राहणे आवश्यक आहे, त्यासाठी एखादी छोटीशी कृती देखील पुरेशी ठरू शकते हा प्रभावी संदेश या कॅम्पेनमधून देण्यात आला आहे. मानवी/सामाजिक नाते निर्माण करण्यात, सर्वांना सामावून घेऊन, एकमेकांना जोडून राहण्याला प्रोत्साहन देण्यात एक नेटवर्क मोलाची भूमिका कशाप्रकारे बजावू शकते हे समजावून सांगण्यासाठी दैनंदीन जीवनातील प्रसंगांचा वापर करण्यात आला आहे.
एकमेकांना कॉल किंवा मेसेज करण्याची एक छोटीशी कृती देखील एखाद्या व्यक्तीचे एकटेपण दूर करू शकते, स्नेह व प्रेमाच्या भावनेचा ओलावा जीवनात निर्माण करू शकते हे यामधून दर्शवण्यात आले आहे. वी हे विश्वसनीय सहयोगी असल्याचे दर्शवणारे ३६० डिग्री कॅम्पेन ‘बी समवन्स वी‘ कॅम्पेन युवा ग्राहकवर्गाला कनेक्ट करते, जोडून ठेवते आणि त्यांचा मूड खुलवते.
सध्याच्या काळात भेडसावत असलेल्या अनोख्या समस्यांबाबत वोडाफोन आयडियाचे सीएमओ अवनीश खोसला यांनी सांगितले, “एकलकोंडेपणाची समस्या भारतात वाढू लागली आहे, खासकरून युवा वर्ग या समस्येने ग्रस्त आहे. आम्ही असे मानतो की, कनेक्टिविटीमध्ये मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेला ब्रँड या नात्याने आम्ही असे मानतो की ही समस्या दूर करण्यात आमची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. ‘बी समवन्स वी‘ हे आमचे कॅम्पेन सर्वांना सामावून घेण्याचे आमचे धोरण दर्शवते, जगामध्ये कोणीही एकलकोंडे राहू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे यामधून अधोरेखित केले जात आहे.”
कॅम्पेनची संकल्पना ऑगिल्वी इंडियाने विकसित केली असून, यामध्ये दैनंदिन जीवनातील विविध पैलूंचा समावेश करण्यात आला आहे. अशा घटना किंवा स्थिती ज्यामुळे आपल्याला एकटेपणा वाटतो त्यावर यामध्ये लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ‘अकेले अकेले कहा जा रहे हो‘ या गाण्याचा देखील अतिशय नव्या आणि रोचक पद्धतीने करण्यात आलेला वापर हे या कमर्शियलचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
गोष्ट पहिली: दांडिया: कॉलेजचे मित्र एका महोत्सवासाठी दांडियाचा सराव करत असल्याचे पाहून एका मुलाला आपण एकटे असल्याचे, आपल्याला बाहेर ठेवण्यात आल्यासारखे वाटत असते. अचानक त्याला एक व्हिडिओ कॉल येतो, दांडिया प्रॅक्टिस करत असलेल्यांपैकी एक मुलगा त्याला म्हणतो, “भाई…दांडिया देखते ही रहेगा या फिर सीखने भी आएगा?” हे ऐकताच मुलाच्या चेहऱ्यावर हास्य येते आणि तो सर्वांसोबत मिळून दांडिया प्रॅक्टिस करू लागतो.
गोष्ट दुसरी: खीर: ऑफिसमध्ये नुकतीच जॉईन झालेली एक मुलगी, नर्व्हस असते, तशात पूर्ण भरलेल्या कॅफेटेरियामध्ये तिला कुठे बसावे समजत नसते. एका कोपऱ्यात रिकामी सीट दिसते. तिथे ती जाऊन बसते तोच तिला एक मेसेज येतो, “हे! यम्मी खीर हियर…जॉईन अस?” ती गर्दीकडे पाहते तर दुरून एक मुलगी तिला पाहून हात हलवताना दिसते, तिच्या हातात तिचा लंचबॉक्स असतो. ही मुलगी हसते आणि आपल्या ऑफिस मित्रमैत्रिणींमध्ये जाऊन बसते, ते तिचे स्वागत करतात व तिला त्यांच्यासोबत बसण्यासाठी जागा करून देतात.
ऑगिल्वीचे सीसीओ हर्षद राजाध्यक्ष आणि कैनाझ कर्माकर यांनी सांगितले, “सध्याच्या काळात मनुष्याला भेडसावत असलेली सर्वात मोठी समस्या आहे एकलकोंडेपणाची. एक साधा फोन कॉल, मेसेज किंवा कोणत्याही प्रकारचे कनेक्शन, समोरच्या व्यक्तीच्या चित्तवृत्तींमध्ये बदल घडवून आणू शकते. कॅम्पेनमधील प्रत्येक गोष्ट एकलकोंडेपणाचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवते – ऑफिसमधील पहिला दिवस, नव्या शहरात शिक्षण घेताना येणारे अनुभव अशा दैनंदिन जीवनातील घटनांचा यामध्ये समावेश केला आहे. ऑगिल्वीमध्ये वी साठी क्रिएटिव्हचे प्रमुख रोहित दुबे यांनी या गोष्टी रचल्या असून क्रोम फिल्म्सचे अमित शर्मा यांनी त्या प्रत्यक्ष समोर मांडण्याचे काम केले आहे. “हमारी दुनिया में अकेलेपन की कोई जगह ना हो” ही सदिच्छा या कॅम्पेनमधून व्यक्त केली जात आहे.”
५ ऑक्टोबर २०२३ रोजी पहिल्यांदा विश्व कप सामन्यादरम्यान हे कॅम्पेन प्रक्षेपित केले जाणार आहे. याशिवाय विविध चॅनेल्स व डिजिटल मीडियावर देखील हे कॅम्पेन चालवले जाईल. फिल्म्सबरोबरीने डिजिटल, ओओएच आणि रिटेलमध्ये देखील हे कॅम्पेन चालवले जाईल.
