लार्ज आणि मिडकॅप विभाग तुमच्या पोर्टफोलिओला स्थिरता व वृद्धी देऊ शकतो
आजच्या काळात गुंतवणूकदारांसमोर म्युच्युअल फंडांचे अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची क्षमता व आर्थिक उद्दिष्टांवर अवलंबून असतो.
गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी सेबीने इक्विटी म्युच्युअल फंडांचे वेगवेगळे विभाग तयार केले आहेत, उदाहरणार्थ, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप इत्यादी. आपली गुंतवणूक सातत्याने आणि स्थिरपणे वाढत राहावी असे ज्यांना वाटत असते असे दीर्घकालीन गुंतवणूकदार लार्ज व मिड कॅप या विभागांना सर्वाधिक प्राधान्य देतात.
लार्ज आणि मिड कॅप विभाग म्हणजे काय?
लार्ज कॅप स्टॉक आणि मिड कॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या विभागांना लार्ज आणि मिड कॅप विभाग म्हणतात. गुंतवणुकीच्या उद्देशासाठी, बाजार भांडवलीकरणाच्या दृष्टीने टॉप २५० स्टॉक या विभागात गणले जातात. फंड मॅनेजरला कमीत कमी प्रत्येकी ३५% गुंतवणूक लार्ज आणि मिड कॅपमध्ये करावी लागते.
लार्ज आणि मिड कॅपमध्ये गुंतवणूक का करावी?
टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे सिनियर फंड मॅनेजर श्री. चंद्रप्रकाश पडियार सांगतात, “बाजारपेठेतील लार्ज आणि मिडकॅप विभागात निर्माण होणाऱ्या संभाव्य भांडवल वृद्धी संधींचा लाभ घेण्याचे टाटा लार्ज अँड मिड कॅप फंडचे लक्ष्य असते. ‘स्टॉक पिकर्स डिलाईट’ म्हणून नावाजल्या जाणाऱ्या लार्ज अँड मिड कॅप फंडमध्ये इक्विटी बाजारपेठेतील संधी शोधण्यासाठी कठोर संशोधन केले जाते. या संधी मंदीनंतर तेजीत आलेल्या कंपन्यांमध्ये तसेच जिथे मूलभूत गोष्टींमध्ये सुधारणा घडून येत आहेत अशा कंपन्यांमध्ये सापडू शकतात.
फंड मॅनेजरला जिथे संधी आढळून येतात अशा लार्ज व मिडकॅप स्टॉकमध्ये टाटा लार्ज अँड मिड कॅप फंड गुंतवणूक करतो. म्हणूनच व्यवहार्य किमतीला वृद्धी (जीएआरपी) या गुंतवणूक सिद्धांताचा वापर करून बॉटम-अप दृष्टिकोनाच्या आधारे स्टॉकची निवड जरी केली जात असली तरी हा फंड सक्रियरित्या व्यवस्थापित असून त्याचे स्वरूप डायनॅमिक आहे. जीएआरपी दृष्टिकोनामुळे आम्ही उच्च गुणवत्तापूर्ण शेयर्सवर बोली लावू शकतो आणि त्याचवेळी हे देखील सुनिश्चित करू शकतो की दर्जेदार शेयर्स योग्य किमतींना खरेदी केले जाऊ शकतील. या दृष्टिकोनामुळे वृद्धी व मूल्य गुंतवणुकीचे सर्वोत्तम पैलू एकत्र करून व्यक्तिगत स्टॉक निवडले जाऊ शकतात. व्यवहार्य मूल्यांकनाला ट्रेड करत असलेल्या, सरासरीपेक्षा जास्त उत्पन्न देऊ शकतील आणि वृद्धी मिळवू शकतील अशा कंपन्यांची निवड करणे हा जीएआरपी गुंतवणूक सिद्धांत स्वीकारण्यामागचा उद्देश आहे.”
लार्ज आणि मिड कॅप विभागात गुंतवणूक करण्याचे फायदे:
- वैविध्य: लार्ज आणि मिड कॅपमध्ये गुंतवणूक केलेली असेल तर त्यातील जोखीम किंवा अस्थिरता कमी होते. अशाप्रकारचे वैविध्य फंड मॅनेजरला दीर्घ कालावधीत अधिक जास्त जोखीम समायोजित परतावा मिळवून देण्यात मदत करते.
- स्थिरता: विश्वसनीय आर्थिक कामगिरी आणि स्थापित उपस्थिती यामुळे लार्ज कॅप स्टॉक पोर्टफोलिओला स्थिरता मिळवून देऊ शकतात.
- वृद्धी संभाव्यता: मिड कॅप स्टॉक उच्च वृद्धी आणि अधिक जास्त संभाव्य लाभ मिळवून देऊ शकतात.
