Wednesday, June 10, 2026
Latest NewsSports

लायन्स् क्रिकेट क्लब, युनिक स्पोर्ट्स क्लब संघांनी उद्धघाटनाचा दिवस गाजवला !!

पुणे :  फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब तर्फे आयोजित पहिल्या ‘फिनिक्स् करंडक’ अजिंक्यपद प्रौढ गट टी-२० क्रिकेट स्पर्धेत लायन्स् क्रिकेट क्लब आणि युनिक स्पोर्ट्स क्लब संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्धघाटनाचा दिवस गाजवला.

सहकारनगर येथील ल.रा.शिंदे हायस्कूल मैदान आणि स्केल-अप मैदान, वारजे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत संजय इनामदार याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर लायन्स् क्रिकेट क्लबने जेडब्ल्युडी मॅजिशियनचा २४ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना लायन्स् क्रिकेट क्लबने ११६ धावा धावफलकावर लावल्या. प्रशांत भुरूक (३४ धावा) आणि शिवदत्ता पटणे (२० धावा) यांनी संघाचा डाव सावरला. या आव्हानाचा पाठलाग करताना जेडब्ल्युडी मॅजिशियनचा डाव ९२ धावांवर मर्यादित राहीला. संजय इनामदार याने ८ धावात ४ गडी बाद करून भेदक गोलंदाजी केली. दुसर्‍या बाजूने गौरव ठोंबरे यानेही (३-२२) चमकदार गोलंदाजी केली.

चिराग शेरकर याच्या नाबाद ६५ धावांच्या खेळीमुळे युनिक स्पोर्ट्स क्लबने बीकेसी क्लबचा ४ गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना बीकेसी क्लबने १३१ धावांचे आव्हान उभे केले. चिराग शेरकर याने ४४ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६५ धावांची खेळी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. युनिक स्पोर्ट्स क्लबने १९.३ षटकात व ६ गडी गमावून हे लक्ष्य गाठले.

या स्पर्धेचे उद्घाटन चित्रपट आणि नाट्य अभिनेते अजय पुरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी स्पर्धेचे संचालक आणि संयोजक श्रीनिवास सरवदे, प्रफुल्ल मानकर, सचिन जयवंत, सौरभ रवालिया, शैलेश देशपांडे, सचिन कापडे, अनिल मांडके, प्रशांत गेवारी, महेश शिंदे आणि स्नेहलकुमार कासार आदि मान्यवर उपस्थित होते.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
लायन्स् क्रिकेट क्लबः २० षटकात १० गडी बाद ११६ धावा (प्रशांत भुरूक ३४, शिवदत्ता पटणे २०, विजय जाधव २-१९, केतन कुरवालकर २-२१) वि.वि. जेडब्ल्युडी मॅजिशियनः १६.१ षटकात १० गडी बाद ९२ धावा (सुमित मेसी ३१, रूपेश गायकवाड नाबाद २१, संजय इनामदार ४-८, गौरव ठोंबरे ३-२२); सामनावीरः संजय इनामदार;

बीकेसी क्लबः २० षटकात ८ गडी बाद १३१ धावा (अभिषेक मोहीते २७, सुधीर साठे २२, महेश दिवटे २०, नितीन काटे ४-२२) पराभूत वि. युनिक स्पोर्ट्स क्लबः १९.३ षटकात ६ गडी बाद १३५ धावा (चिराग शेरकर नाबाद ६५ (४४, ७ चौकार, १ षटकार), अमित बलडोटा २५, विजय कुतवळ ३-२१); सामनावीरः चिराग शेरकर;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading