सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलां -मुलींच्या वसतिगृहातील ओपन जिमचे उदघाटन
पुणे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांना वसतिगृहातच व्यायाम करता यावा यासाठी दोन्ही वसतिगृहात ओपन जिम उभारण्यात आले आहे. त्याचे उद्धघाटन गुरुवार दिनांक ०५ ऑक्टोबर रोजी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. (Inauguration of Open Gym in Savitribai Phule Pune University Boys-Girls Hostel)
यावेळी प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सीएमए चारुशीला गायके, विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, वसतिगृह प्रमुख ,शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना ओपन जिम वसतिगृहातच उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे त्यांना व्यायाम आणि शारीरिक कसरतींची सुविधा निर्माण झाली आहे. खुल्या वातावरणात नियमितपणे व्यायाम करून आपले शरीर सुदृढ बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना या जिमचा फायदा होईल.
