अॅमेझॉनतर्फे भारतातील विक्रेते, किरकोळ विक्रेते, ब्रँड आणि उत्पादकांसाठी मल्टी चॅनल फुलफीलमेंट सादर
Amazon.in ने आज भारतात मल्टी-चॅनल फुलफिलमेंट (MCF) सादर करत असल्याची घोषणा केली. या सादरीकरणासह, D2C ब्रँड, उत्पादक आणि सर्व उद्योगांमधील किरकोळ विक्रेते यांच्यासह विक्रेते त्यांच्या पूर्ततेच्या कामकाजामध्ये क्रांती करू शकतात. तसेच अॅमेझॉनचे संपूर्ण भारतात असलेले स्थान, अत्याधुनिक पूर्तता केंद्रे आणि त्यांच्या स्वतःच्या वेबसाइट्ससह अतुलनीय गती आणि सोयीसह अखंड पूर्तता सक्षम करत ग्राहकांच्या ऑर्डर हाताळण्यासाठी लॉजिस्टिक क्षमतांचा लाभ घेत त्यांचा ग्राहक अनुभव वाढवू शकतात. एमसीएफ द्वारे अॅमेझॉन ग्राहकांच्या ऑर्डर पूर्तीचे सार्वत्रिकीकरण करते आणि अॅमेझॉनच्या १००% भारतातील सेवा देत असलेल्या पिन कोड्सच्या (२०,००० हून अधिक पिन कोड्स) विस्तृत कव्हरेजचा फायदा घेऊन, नवीन व्यवसाय संधी खुल्या करून विक्रेत्यांना भारतातील त्यांची बाजारपेठ वाढवण्यास सक्षम करते.
एमसीएफ विक्रेत्यांसाठी त्यांच्या अॅमेझॉन बाहेरच्या खरेदीदारांसाठी ऑर्डर तयार करणे, त्यांचा ट्रॅक ठेवणे आणि टॅक्स इनव्हॉइस तयार करणे सोपे करते, तसेच जलद शिपिंग आणि जलद वितरण सुनिश्चित करते. हे विक्रेत्यांसाठी पूर्तता प्रक्रिया सुलभ करते, ग्राहक अनुभव वाढवते आणि वाढीव विक्रीसाठी संधी देते. एमसीएफ सह, विक्रेते त्यांच्या ऑफ अॅमेझॉन ऑर्डर स्वयंचलित करू शकतात. त्यामुळे गुंतागुंत दूर होते आणि संपूर्ण ऑर्डर पूर्ण करण्याची प्रक्रिया सुलभ होते. विक्रेत्यांना अॅमेझॉन च्या पूर्ततेचाही लाभ होईल. ही एक लवचिक, परवडणारी आणि इनबाउंड वाहतूक, लेबलिंग, स्टोरेज, ऑर्डर व्यवस्थापन, पिक-पॅक आणि शिपिंग सेवा यातील वाढवता येण्याजोगे स्टोरेज आणि पूर्तता उपाय सुविधा असून विक्रेत्यांना कामकाज सुव्यवस्थित करण्यास आणि कार्यक्षमता वाढविण्यास सक्षम करते.
“डिजिटलीकरणाची आव्हाने, मर्यादित पोहोच आणि उत्पादकता मर्यादा अनेकदा इन्व्हेंटरी ट्रॅकिंग आणि शिपिंगसाठीच्या जादा खर्चासारख्या इतर आव्हानांसह मध्यम आणि लहान ब्रँडच्या विस्तारात अडथळा आणतात. मल्टी-चॅनल फुलफीलमेंट त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वसमावेशक आणि सर्वोत्तम उपायाद्वारे या आव्हानांवर उपाय देते. यामुळे विक्रेत्यांना उत्पादन विकास, विपणन आणि ग्राहक सेवा यांसारख्या मुख्य व्यावसायिक क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करण्यास अनुमती मिळते,” असे अॅमेझॉन इंडियाच्या फुलफिलमेंट चॅनल्स आणि ग्लोबल ट्रेडचे उपाध्यक्ष विवेक सोमरेड्डी म्हणाले. “ही नाविन्यपूर्ण उपाय सुविधा सुपर-फास्ट डिलिव्हरी, 24×7 ग्राहकांच्या ऑर्डरची पूर्तता सुनिश्चित करते आणि स्वतंत्र विक्री चॅनेलसाठी इन्व्हेंटरी पूलिंगची आवश्यकता काढून टाकते. हे अखंड एकत्रीकरण, प्रगत तंत्रज्ञान, सर्वोत्कृष्ट पूर्तता, विपुल वितरण कव्हरेज, प्रगत ट्रॅकिंग आणि सर्वसमावेशक पाठबळ विक्रेत्यांना भारतीय बाजारपेठेत भरभराट करण्यास सक्षम करते. अॅमेझॉनद्वारे मल्टी-चॅनल फुलफीलमेंटद्वारे कार्यक्षम आणि विश्वासार्ह पूर्तता विक्रेत्याच्या ब्रँड नावलौकिकावर सकारात्मक परिणाम करू शकते. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास आणि निष्ठा वाढते,” असेही विवेक पुढे म्हणाले.
“आमच्यासाठी गोदाम कामकाज आणि दळणवळणासाठीच्या कामाच्या भागीदारांचे व्यवस्थापन करणे नेहमीच खर्चिक आणि कामकाजाचे ओझे वाटणारे काम राहिले आहे. विशेषतः, जलद विकास होत असतानाच्या काळात, हे प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी आमच्याकडे वेळ आणि संसाधनांची कमतरता होती. मल्टी चॅनल फुलफीलमेंटची अंमलबजावणी करण्याचा परिणाम म्हणून अॅमेझॉनच्या एंड टू एंड पूर्तता सोल्यूशनचा वापर करून आम्ही अनेक प्लॅटफॉर्मवर आमची पूर्तता प्रक्रिया सुव्यवस्थित केली आहे. आमच्या खर्चात कपात करण्याच्या जोडीलाच त्यांची अत्यंत कार्यक्षम पूर्तता आणि वितरणामुळे आमच्या विविध पूर्तता केंद्रांमध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये सुधारणा झाली आहे. आम्हाला आमची इन्व्हेंटरी अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास अनुमती मिळाली आहे, असे जय इनग्रेडियंट्स (अमेझॉनवर विक्रेता) चे जयंशु चतुर्वेदी संचालक म्हणाले.
एमसीएफ विस्तारित ग्राहक पोहोच, सुधारित ऑर्डर पूर्ण करणे, कामकाज क्लिष्टता कमी करणे, खर्च आणि वेळेची बचत, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, जलद शिपिंग, ऑटोमेटेड ऑर्डर प्रोसेसिंग आणि ग्राहकांच्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी लवचिकता यासह महत्त्वाचे लाभ देते. स्वारस्य असलेले विक्रेते आता अॅमेझॉनच्या मल्टी-चॅनल फुलफिलमेंट सेवेचा लाभ घेऊन त्यांच्या पूर्ततेच्या कामकाजामध्ये क्रांती घडवून आणण्याची आणि ग्राहक अनुभव वाढवण्याची संधी घेऊ शकतात. अॅमेझॉनचे एमसीएफ सर्व विक्रेत्यांसाठी हे क्षेत्र समान स्तरावर आणण्यासाठी प्रति ऑर्डर ५९ रुपये इतक्या कमी स्वागतमूल्य किमतीत सर्वसमावेशक उपाय सादर करतात.
