Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest News

अर्जुन अप्पीला भेटू शकेल का ?

‘अप्पी आमची कलेक्टर’ ह्या मालिकेत अनेक रोमांचक घटना घडत आहेत. अनेक ट्विस्ट या  मालिकेत घडणार आहेत. आतापर्यंतच्या भागात आपण पाहिलंत की अर्जुनची कोर्टात सुनावणी आहे आणि अप्पीला खूप ताप असल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले आहे. अर्जुनची अत्यंत द्विधा मनस्थिती झाली असून त्याला अप्पीची खूप काळजी वाटते आहे. सर्व परिस्थिती आणि पुरावे अर्जुनच्या विरोधात आहेत तर दुसरीकडे हॉस्टिपलमध्ये डॉक्टर सांगतायत अप्पीचा ताप उतरला नाही तर तिच्या बाळाला धोका होऊ शकतो. घरचे सर्व खूप घाबरले आहेत. अर्जुन अप्पीच्या भोवती जणू संकटांचे काळे ढग जमून आले आहेत, आता येईल का त्यातून एखादा सोनेरी आशेचा किरण ? आता ह्या सगळ्यातुन अर्जुनची सुटका होणार की त्याला शिक्षा होईल ? अर्जुन अप्पीला भेटू शकेल का  ?

पाहायला विसरू नका ‘अप्पी आमची कलेक्टर’ संध्या ६:३० वाजता, फक्त झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading