विस्तार अधिकाऱ्याला ४० हजारांची लाच घेतल्या प्रकरणी अटक
पुणे – मावळ तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीवर प्रशासक असलेल्या विस्तार अधिकाऱ्याला ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. मावळ पंचायत समितीच्या कार्यालयात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
अंकुश किसन खांडेकर (वय ५७) असे अटक केलेल्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खांडेकर हे मावळ तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान लोहगड गावात सोलर प्रकल्प राबविण्याच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी त्यांनी संबंधित ठेकेदाराला लाच मागितली. याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तडजोड करून ४० हजारांची लाच घेतला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खांडेकर आणि अन्य एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
