होंडा रेसिंग इंडियाचे रायडर कविन क्विंतल यांची २०२३ इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R च्या चौथ्या फेरीत चमकदार कामगिरी
चेन्नई – दमदार कामगिरी करत आणि होंडाच्या रेसिंग वैशिष्ट्यांचे दर्शन घडवत इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपमध्ये तरुणाईने लक्ष वेधले. मद्रास इंटरनॅशनल सर्किट, चेन्नई येथे झालेल्या २०२३ इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R च्या चौथ्या फेरीत तरुण रायडर्सनी थरारक कामगिरी केली.
वीकेंडला झालेली ही रेस उत्कंठावर्धक होती. रेसिंग नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि रायडर्सची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या NSF250R या मोटोथ्री रेस मशिनवर नव्या पिढीच्या रायडर्सनी सर्वोत्तम कामगिरी केली.
२०२३ इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R च्या चौथ्या फेरीच्या पहिल्या रेसमध्ये सर्वाधिक वेग राखत कविन क्विंतल यांनी परत एकदा आघाडी घेतली. 15:06.431 ची एकूण वेळ नोंदवत क्विंतल यांनी रेसमध्ये पहिले स्थान मिळवले, तर 15:22.491 ची एकूण वेळ नोंदवणाऱ्या मोहसिन पी यांनी दुसरे स्थान मिळवले. केवळ ०.०४३ सेकंदांच्या फरकाने त्यांचे पहिले स्थान हुकले. राहीश खत्री यांनी तिसरे स्थान मिळवले.
दुसऱ्या रेसमध्येही रेसवर सर्वात वेगवान राहात कविन क्विंतल यांनी आपली आघाडी कायम राखली आणि सहा लॅप्सच्या रेसमध्ये 11:20.815 ची वेळ नोंदवत रेस पहिल्या स्थानावर समाप्त केली. आतापर्यंत मिळालेला आंतरराष्ट्रीय अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर कविन यांनी २०२३ इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R च्या चौथ्या फेरीत दुहेरी विजय मिळवला. ट्रॅकवरील इतर रायडर्सना मागे टाकत कविन यांनी 13.576 सेकंदांच्या लक्षणीय फरकाने रेस जिंकली.
दुसऱ्या व तिसऱ्या स्थानासाठी मोहसिन पी, जॉन रीव्ह्ज इमॅन्युअल आणि रक्षित दवे यांच्यात रोमहर्षक लढत झाली. पोडियम फिनिशसाठी तिन्ही रायडर्समध्ये तोडीस तोड टक्कर झाली. या अटीतटीच्या लढतीत रायडर्सचे स्थान सतत बदलत होते, मात्र अखेर मोहसिन यांनी पुढे जात दुसरे स्थान मिळवले. त्यांनी एकूण 11:34.391 वेळेत रेस पूर्ण केली. जॉन रीव्ह्ज इमॅन्युअल यांनी तिसरे स्थान मिळवले. हे त्यांचे या विभागातील पहिले पोडियम फिनिश ठरले. जॉन यांचे दुसरे स्थान केवळ 0.057 सेकंदांच्या फरकाने हुकले.
रायडर्सनी केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करताना विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘होंडाचे अनुभवी मार्गदर्शक आणि अनुभवी रायडर्सच्या हाताखाली नव्या रायडर्सचे कौशल्य प्रत्येक फेरीसह उंचावत आहे. आज आमच्या रायडर्सनी रेसट्रॅकवर नवी चिकाटी आणि जिद्दीचे दर्शन घडवले. कविन यांची कामगिरी असामान्य होती. त्यांनी स्पर्धेवर वर्चस्व गाजवत या फेरीत दुहेरी विजय मिळवला. या फेरीत जॉन रीव्ह्ज इमॅन्युअल यांनीही चांगली कामगिरी करत पहिले पोडियम फिनिश संपादन केले. या हंगामाची अखेर जवळ येत असून आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी आमचे रायडर्स उत्सुक आहेत.’
