‘म. गांधींचे विचार आजही देशाच्या कणाकणात जिवंत’
पुणे: बंदुकीच्या गोळीने माणसं मारता येऊ शकतात, पण सत्य कधीही संपविता येऊ शकत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यांनी १९४८ साली त्यांची हत्या केली. पण, महात्मा गांधीचे विचार आजही देशाच्या कणाकणात जिवंत आहेत. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग नाना चव्हाण पाटील यांनी केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त धायरीत खडकवासला काँग्रेसतर्फे अभिवादन करण्यात आले. चव्हाण पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. या वेळी उपस्थित वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य मिलिंद पोकळे, पुणे शहर काँग्रेस पर्यावरण उपाध्यक्ष धनंजय पाटील, किसान काँग्रेस उपाध्यक्ष शंकरराव दांगट, धायरी गाव माजी सरपंच गुलाब अण्णा पोकळे, धनंजय पोकळे, सोपानराव लयगुडे, चंद्रकांत वांजळे रघुनाथ यादव, राजाभाऊ कुंभार आदी उपस्थित होते.
