fbpx
Tuesday, September 26, 2023
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सातारा : नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये शांतता व सामाजिक सलोखा राखावा – विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी

सातारा – पुसेसावळी ता. खटाव येथील कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. सोशल मीडियावर कोणतीही चूकीची पोस्ट न करता सामाजिक सलोखा व शांतता राखावी आणि पोलीस व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.

फुलारी यांनी औंध विश्रामगृह येथे परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकरी जितेंद्र डुडी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते. औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी इंस्टाग्रामवरील पोस्टवर एका समूहाच्या दोन मुलांच्या अकाऊंट वरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांना चौकशी कमी बोलवून विचारपूस करण्यात येत असतानाच्या काळात सदर आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या समूहाच्या युवकांकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आली. दि. १० सप्टेंबर२०२३ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास दुसऱ्या समूहाच्या विचारसरणीच्या सुमारे शंभर ते दीडशे युवकांनी एकत्र जमून अचानकपणे दुचाकी व चार चाकी वाहने पेटवून दिली . पहिल्या समूहातील युवकांना मारहाण करून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करत असताना पोलिसांनी योग्य त्या बाळाचा वापर करून सदर जमावस पांगवण्यात यश मिळवले. सदर मारहाणीमध्ये एकूण दहा व्यक्ती जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या सर्वांची प्रकृती चांगली आहे. तसेच सदर घटनेमध्ये एक व्यक्ती उपचार दरम्यान मयात झाली आहे.

पूसेसावळी ता. खटाव येथील घटनेच्या अनुषंगाने औंध पोलीस ठाणे येथे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून आक्षेपार्ह मजकुराच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक  वाळवेकर ,औंध पोलीस ठाणे हे करीत आहेत .तर सदर घटनेतील खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा हे करीत आहेत. गुन्ह्याच्या तपासा दरम्यान आतापर्यंत सुमारे २३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे  फुलारी यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: