fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsPUNETOP NEWS

मार्केट यार्डातील मच्छी मार्केट रद्द करण्याची उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील वाहनतळावर मच्छी मार्केट उभारण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने मंजूर केलेला प्रस्ताव रद्द करण्याची सूचना केल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.

आमदार मिसाळ म्हणाल्या, या भागात दाट लोकवस्ती आहे, मच्छी मार्केटमुळे आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. या परिसरातील नागरिकांचा मच्छी मार्केटला तीव्र विरोध असून, मी नागरिकांसोबत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जनभावना पोहोचविल्या असून, त्यांनी मंत्री सत्तार यांना प्रस्ताव रद्द करण्याच्या सूचना केल्या आहेत.

मिसाळ पुढे म्हणाल्या, आज सकल सर्वधर्म पुणे परिवाराच्या वतीने या निर्णयाचा विरोध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सहभागी होऊन मी या निर्णयाला विरोध केला.

Leave a Reply

%d bloggers like this: