मोदी I. N. D. I. A ला घाबरले? देशाचे नाव बदलण्याच्या हालचाली
नवी दिल्ली : ‘जुडेगा भारत जितेगा इंडिया’ असा नारा देत सर्व विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र आले. अन् यांची धास्ती घेवून आता पंतप्रधान थेट देशाचे नावच बदलण्यासाठी निघाले आहेत. G 20 परिषदेच्या आधी हे नामांतर करण्याच्या हलचाली सुरू झाल्या असल्याचे चित्र आहे. यासाठीच ऐन गणेशोत्सवात भाजप सरकारने विशेष अधिवेशन बोलावल्याची चर्चा रंगली आहे.
ही चर्चा होण्याचे कारण म्हणजे, नुकतेच राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांच्या कडून G 20 च्या प्रतिनिधींसाठी जे जेवणाचे आमंत्रण पाठवले गेले आहे, त्यावर राष्ट्रपतींचा उल्लेख President of India असे न लिहिता President of Bharat असे लिहिण्यात आले आहे. प्रेसिडेंट ऑफ भारत हे नाव वापरायला कुणाचीच हरकत नाही, पण संविधानातूनच INDIA हा शब्द काढून टाकायचा आहे का? अशी शंका उपस्थित होत आहे.
काही दिवसांपूर्वी भाजप विरोधी पक्षांच्या आघाडीला बंगळूरुमधल्या दुसऱ्या बैठकीत I. N. D. I. A असे नाव देण्यात आले आहे. या नावाचा उल्लेख न करता त्यांच्यासाठी Ghamandia आघाडी असे म्हणत मोदींनी विरोधकांवर टीका केली. तर आता राष्ट्रपतींच्या अधिकृत राजपत्रावर प्रथमच प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख आल्याने विरोधक टीका करीत आहेत. इतके दिवस शहरांची नावे बदलली जात होती आता थेट देशाचंच नाव बदलले जाणार? की हा बदल नसून केवळ भारत नावाचा आग्रह ठरणार? हे पहाव लागेल.
मोदी जी, हम इंडिया वाले नाक से
साँस लेते हैं और मुँह से खाना खाते हैं। अब आप क्या करोगे? pic.twitter.com/Pc5GsZLodP— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) September 5, 2023
दरम्यान, ‘INDIA’ असा नाम उलेख काढून केवळ ‘भारत’ असा करणे हे सोपे नसणार आहे. हे करायचे असेल तर संविधानमध्ये आर्टिकल 1 मधील ‘INDIA that is BHARAT’ हा उल्लेख काढून टाकावा लागेल. article 52 मध्ये राष्ट्रपतींचा उल्लेख President of India असा करण्यात आला आहे. तेव्हा हे आर्टिकल देखील बदलावे लागणार आहे. तसेच article 124 मध्ये chief justice of India असा उल्लेख आहे तो ही बदलावा लागेल.