‘अनैतिकचे समर्थन करुन’ सत्तेत येणे हीच् भाजप नीती आहे काय ..? ⁃ काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
महात्मा गांधींचा वारसा लाभलेल्या देशात ‘साध्य व साधन’ यांची शुचिता पाळण्याची शिकवण बापूंनी दिली…!
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व विशेषत: ‘गृह खात्याची धुरा सांभाळणारे’ मा देवेंद्र फडणवीस, यांनी एका वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत “राजकारणात टीकुन रहाण्यासाठी अनैतिक गोष्टी कराव्या लागतात” हे धक्कादायक विधान केले व आपल्या पक्षाच्या राजकारणाची दिशा व दशा स्पष्ट केली..!
देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य हे ‘शिव छ्त्रपतींच्या, संताची परंपरा असलेल्या व समाज क्रांतीकारकांचे ‘नैतिक बळ लाभलेल्या’ महाराष्ट्रात अशोभनीय व निंदनीय असुन, राजकीय संस्कार व संविधानीक मर्यादा भंग करणारे असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी जाहीर निवेदनाद्वारे केले..!
“सत्य व अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा गांधींच्या लोकशाहीवादी देशात लोकांप्रती समर्पित कार्यरत-व्यवस्थेला खिळ धालून, संविधानीक पध्दतीने चालू असलेली राज्य-व्यवस्था उलथवुन, सत्ता-स्वार्थ साधणाऱ्या कृतीस “राजकारण (?)” असे संबोधणे व अनैतिकतेचे समर्थन करणे हे राजकीय साधन शुचितेचा भंग करणारे निषेधार्य वक्तव्य आहे असे प्रतिपादन ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ने केले.
महात्मा गांधींचा वारसा असलेल्या देशात ‘साध्य व साधन’ या दोन्हींची सुचिता पाळण्याची शिकवण बापूंनी दिली आहे. त्यानुसार गरीब, पिडीत, मजुर, शेतकरी, दुर्बल व वंचितांसाठी व त्यांच्या भल्यासाठी प्रसंगी चाकोरी बाहेर जाऊन निर्णय घेणे, राजकारण करणे वर्ज्य नाही व ते कार्य जागरूक विरोधीपक्ष नेते पदी राहुनही करता येत होते. मात्र भितीग्रस्त फडणवीसांची ‘अनैतिक पध्दतीने सत्ता प्राप्ती’ हेच राजकारणाचे साध्य व साधन असल्याचे स्पष्ट झाले.
‘सत्यमेव जयते’चे ब्रीद अंगीकारणाऱ्या देशात, अनैतिकचे समर्थन करुन सत्तेत येणे हीच अखेर भाजप नीती आहे काय (?) असा उपहासात्मक सवाल ही त्यांनी केला..!
