Thursday, June 4, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

संभाजी भिडेंची ‘देश विरोधी वक्तव्ये’ सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वादानेच्…! काँग्रेस चा आरोप..!

पुणे : हजारो स्वातंत्र्य सैनीकांच्या शहीदत्वातुन, महात्मा गांधी, नेहरू, पटेल, आझाद, बोस आदींच्या प्रदीर्घ संघर्षातुन मिळालेल्या ‘स्वातंत्र्याची व स्वातंत्र्य दिनाची’ निर्भत्सना करीत, १५ ॲागस्ट या स्वातंत्र्यदिनी ‘दुखवटा पाळण्याचे’(?) अघटित आवाहन करत, देशविरोधी भुमिका घेणाऱ्या संभाजी भिडेंच्या विरोधात सत्ताधारी वा गृहखाते कारवाई का करत नाही..? असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला असून भिडेंच्या वक्तव्याचा तिव्र निषेध केला आहे..!
देशातील ‘मुठभर मुस्लिमांचा’ द्वेष व तिरस्कार करणाऱ्यांना, अखंड भारताच्या नावा खाली ‘हातभर  पाकिस्तान’सह भारत कसा चालेल(?) असा सवाल करीत, हि परस्पर विरोधी भुमिकाच नाही तर अनैसर्गिक व हास्यास्पद विधान असल्याचे काँग्रेस प्रवक्ते यांनी सांगितले..!
स्वातंत्र्य पुर्व काळात, मुस्लिम लीग सोबत हिंदु महासभेने वारंवार बंगाल सह अनेक राज्यात युती केली.. महंमद अली जीनां सोबत ‘द्वी राष्ट्रवादाचा सिध्दांत’ देखील मांडला..!
मात्र तरीही पाकीस्तान सह अखंड भारताच्या वल्गना करायच्या, देशांतर्गत जातीय व धार्मिकवाद उकरून काढून सामाजिक दुही व बेबंदशाही माजवण्याचे प्रयत्न करायचे हेच खरेतर प्रजासत्ताक स्वतंत्र भारत विरोधी राष्ट्रद्रोही कृत्य आहे. अशा कुहेतुंच्या कृत्यांमुळे सामान्य जनतेचे, ‘वाढती महागाई, बेकारी, राष्ट्रीय संपत्तीची लूट व बळीराजाच्या समस्या’ या वरून लक्ष विचलीत करण्याचे निंद्य प्रयत्न देखील सत्ताधारी भाजपच्या पाठींब्यावर होत आहेत असा आरोप देखील काँग्रेस ने केला..!
राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह मंत्री यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर सौम्य प्रतिक्रिया देऊन वेळ मारुन नेऊ नये..असे ही सांगितले..!
नथुराम गोडसे चे उदात्तीकरण “योग्य नाही”…* १५ॲागस्ट हा स्वातंत्र्य दिन नाही हे म्हणणे “योग्य नाही”* असे मिळमिळीत वक्तव्य करीत, देवेंद्र फडणवीसांनी “नरो वा कुंजोरवा” भुमिकेत जाऊन तोंड लपवण्याचा प्रकार करू नये..!!
मागील वर्षी १५ ॲागस्ट दिनी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा हा काय फक्त “शत्रु राष्ट्र असलेल्या “चिन’ला तिरंगा झेंड्याची व कापडाची ॲार्डर द्वारे आर्थिक मदत करण्यासाठी(?) “देशात, हर घर तिरंगा” अभियान राबवले काय(?) असा उपहासात्मक सवाल देखील, काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला..!
सत्ताधाऱ्यांना हे आरोप खोटे ठरवायचे असतील तर, देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या, शहीदांचा, प्रजासत्ताक भारताचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करावी.. अन्यथा मा. सर्वोच्च न्यायालयाने या वक्तव्याची नोंद घ्यावी असे काँग्रेस ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी म्हंटले आहे..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading