Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune : पावसामुळे इमारतीचे छत कोसळल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : कॅम्प येथील दस्तुर मेहेर रस्त्यावरील जुन्या इमारतीचे छत पावसामुळे कोसळल्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये घरातील वृद्धाचा भाऊ जखमी झाला आहे.स्टॅनली डिसूजा (वय 57) यांचा या दुर्घटनेत दुर्दैवाने दिगाराखाली अडकल्यामुळे मृत्यू झाला तर जेरी डिसूजा (वय 46 ) हे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. कॅम्प भागातील दस्तुर मेहेर रस्त्यावर घर क्रं ८३० मध्ये स्टॅन्ली डिसुझा परिवारासह वास्तव्यास आहेत.

आज सकाळपासून या भागात पाऊस पडत होता. डिसुझा बंधू हे घरात हॉलमध्ये खुर्चीवर बसले होते तर महिला व इतर कुटुंबीय आतील खोली मध्ये होते . अचानक साडे सात वाजण्याच्या सुमारास घरातील पहिल्या मजल्याचे ( टेरेस) छत कोसळून तळमजल्याच्या छतावर पडले. तळमजल्याचा छताचा संपूर्ण भाग हा खाली बसलेल्या स्टॅन्ली डिसुझा यांच्या अंगावर कोसळला. सिमेंट व मातीच्या ढिगाराखाली अडकल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना ढिगार्‍याखालून बाहेर काढून उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ढिगाऱ्याचा काही भाग बाजूला बसलेल्या जेरी डिसुझा यांच्या अंगावर पडल्याने ते देखील जखमी झाले. पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाला सदरची दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी जाऊन ढिगार्‍याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. मात्र दुर्दैवाने या मध्ये एका जेष्टाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाचे रोहित रणपिसे यांनी दिली. या दुर्घटनेची माहिती मिळताच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अभियंता सुखदेव पाटील घटनास्थळी भेट दिली. तसेच पुढील कार्यवाहीचे आदेश दिले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी देखील दुर्घटनाग्रस्त इमारतीचा विद्युतपुरवठा बंद केला आहे. दुर्घटनेतील जखमी व्यक्तीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान धोकादायक जुन्या इमारतींमध्ये पावसामुळे अपघात होण्याची शक्यता वाढलेले असून नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच प्रशासनाने देखील अशा धोकादायक इमारतींची नोंद घेऊन पुढील योग्य ती उपाययोजना करणे देखील आवश्यक आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading