Thursday, June 4, 2026
BusinessLatest News

अनुकरणीय शाश्वत मिठास इनिशिएटिव्हद्वारे यूपीएलने केली कृषी शाश्वततेची पुर्नव्याख्या

शाश्वत कृषी उपायसुविधांमध्ये जगात आघाडीवर असलेले यूपीएल आपल्या दूरदर्शी दृष्टिकोनातून शाश्वततेमध्ये क्रांती घडवून आणण्यात अग्रणी आहे. पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी आणि जगभरातील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याच्या अटूट बांधिलकीसह यूपीएल सातत्याने आपल्या शाश्वत उपायांची श्रेणी वाढवत आहे.

शाश्वत उत्पादन पोर्टफोलिओ आणि शाश्वत कृषी सेवा आणि तंत्रज्ञान उपायसुविधांद्वारे २०४०  पर्यंत जीएचजी उत्सर्जन १ जीटी पर्यंत कमी करण्याच्या प्रतिज्ञेद्वारे शाश्वततेची पुनर्कल्पना करण्यासाठी यूपीएलच्या दृढ बांधिलकीचे हे आणखी उदाहरण आहे. कंपनी २०३० पर्यंत सांडपाणी प्रदूषण दूर करण्याच्या मोहिमेमध्ये वर्ल्ड बिझनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (WBCSD) च्या सुरुवातीच्या तीन जागतिक भागीदारांपैकी एक आहे. कंपनी सध्या सस्टेनॅलिटिक्सच्या ईएसजी कामगिरीमध्ये #१ क्रॉप प्रोटेक्शन कंपनी आहे.

मातीच्या आरोग्यापासून कापणीनंतरचा कचरा कमी करण्यासाठी प्रगत संकरित बियाण्यांपर्यंत,  कार्बन ठसा कमी करणे तसेच पाण्याची कार्यक्षमता यासाठी यूपीएल शेतकऱ्यांसोबत सहयोग करून काम करत आहे आणि त्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी कंपनीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

यूपीएलचा शाश्वत मिठास प्रकल्प म्हणजे शाश्वततेसाठी त्याच्या दृढ समर्पणाचे उदाहरण आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी शाश्वत उपायसुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प संपूर्ण भारतातील यूपीएल आणि साखर कारखानदार यांच्यातील महत्त्वपूर्ण सहकार्याचे प्रतीक आहे. हा अग्रगण्य उपक्रम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध आव्हानांना तोंड देतोयामध्ये  खराब उत्पादनवाढता खर्चमजुरांची कमतरता आणि पाणीटंचाई यांचा समावेश आहे. साखर लागवडीचे पाणी-केंद्रित आणि संसाधनांचा वापर करणारे स्वरूप ओळखूनयूपीएल प्रोन्युटिवा उपक्रम राबवून उद्योगाचा कायापालट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये संरक्षण आणि पोषण यांचा समावेश आहे. या उपक्रमामध्ये झेबा तंत्रज्ञानाचा वापर समाविष्ट आहेहे एक  पूर्णपणे जैवविघटन होऊ शकत असलेल्या नैसर्गिक स्टार्चपासून प्राप्त केलेले पेटंट स्मार्ट तंत्रज्ञान आहे. झेबा तंत्रज्ञानासह प्रोन्युटिवाची अंमलबजावणी करून यूपीएलने पुण्यातील ३,५०० एकर क्षेत्रावरील उसाच्या उत्पादनात प्रभावी १५% वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्याचा  ऑक्टोबर २०२३ पर्यंत १,२०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होईल.

झेबा तंत्रज्ञानाच्या वापरामुळे लक्षणीय जलसंवर्धन झाले आहेअंदाजे ६००,००० लिटर पाण्याची प्रति एकर बचत झाली आहे आणि युरिया खताचा वापर ५० किलो/एकरने कमी झाला आहे. हे प्रयत्न पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि ऊस शेतीशी संबंधित प्रभाव कमी करण्यासाठी योगदान देतात.

यूपीएलची दूरदर्शी उद्दिष्टे पुण्याच्या पलीकडे जाणारी असून कंपनीने आर्थिक वर्ष २४ पर्यंत कर्नाटकतेलंगणामध्य प्रदेशउत्तर प्रदेशमहाराष्ट्र आणि गुजरातमधील अतिरिक्त १५ साखर कारखान्यांसोबत सामंजस्य करार (MOU) करण्याची योजना आखली आहे. पुढील तीन वर्षांमध्येयूपीएल ने एकूण १,०००,००० एकर क्षेत्र व्यापून १०० साखर कारखान्यांसोबत सहयोग करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या सहकार्यांमुळे उसाचे उत्पादन वाढेलनफा वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

साखर कारखान्यांसोबतच्या भागीदारीत सर्वसमावेशक सहयोग समाविष्ट आहेयामध्ये गुड अॅग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस (जीएपी) वर सल्ला सेवाप्रोन्यूटिवाची अंमलबजावणी, प्रगत उपकरणे वापरून यांत्रिकीकरण आणि Nurture.farm अॅपद्वारे ट्रेसेबीलिटी यांचा समावेश आहे. हे उपाय शेतकऱ्यांना ऊस रोपवाटिका स्थापन करण्यास सक्षम करतातसहकारी शेतकऱ्यांना उसाचे बियाणे विक्रीसाठी संधी उपलब्ध करून देतात.

शाश्वत मिठास प्रकल्पासारख्या अग्रगण्य उपक्रमांसह शेतकरी आणि पर्यावरणासाठी सकारात्मक बदल घडवून आणत शाश्वत शेतीसाठी यूपीएल आघाडीवर आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading