Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

‘विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाची’ देशाला गरज, शिक्षणाची कास धरली तरच प्रगतीची कवाडे खुलतील. काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांचे प्रतिपादन

पुणे : शिक्षणास व अभ्यासक्रमास धार्मिक रंग दिले जाण्याचे प्रयत्न होत असुन, २१ व्या शतकात आर्थिक महासत्ता होऊ घातलेल्या भारतास, घार्मिकतेच्या गर्तेत ढकलले जाऊ नये. या करीता शिक्षणाची कास धरून ‘देशास विज्ञाननिष्ठ बनवण्यासाठी’ तरुणांनी शिक्षण व शैक्षणिक दृष्टिकोन अंगीकरण्याची नितांत गरज असल्याचे मत काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले.
मुळशी तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने,
न्यू इंग्लिश स्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण मधील दहावी उत्तीर्ण तसेच इयता पाचवी व आठवी मध्ये स्कॉलरशिप मिळवलेल्या ‘गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे’ आयोजन केले होते या वेळी बोलतांना त्यांनी वरील उद्गार काढले..!
अध्यक्षस्थानी इतिहासाचे अभ्यासक डॉ.  प्रा. गणेश राऊत होते. वैद्यकीय अधिकारी बालाजी लकडे, बँक अधिकारी अमोल शिंदे, न्यू इंग्लिश स्कुलचे मुख्याध्याक रोडे सर, माजी शिक्षणाधिकारी येनपुरे सर, शिवसेना पदाधिकारी नामदेवराव भिलारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुळशी काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश अण्णा पारखी व त्यांचे सहकाऱ्यांनी केले होते.

या प्रसंगी गोपाळदादा तिवारी म्हणाले, शिक्षणामध्ये मानवतावादी दृष्टिकोन असला पाहिजे. निजामशाही व राजेशाहीमध्ये विखुरलेला प्राचिन भारताचे स्वातंत्र्यानंतर ‘संविधानात्मक प्रजासत्ताक राष्ट्र’ झाले, व नागरिक हा केंद्रबिंदू मानून लोकशाही व्यवस्था भारतात प्रस्थापित झाली. प्रत्येक नागरिकास आपल्या प्रगतीचा सर्वांगीण अधिकार व समान मताचा अधिकार मिळाला. हा अधिकार टिकवणे लोकशाहीचे कर्तव्य ठरते. शिक्षण हे सत्याचे महत्त्व विशद करते, वास्तवता दर्शवते, आकलन क्षमता वाढवते, योग्य-अयोग्यतेची जाण निर्माण करते व व्यक्तीला सुसंस्कृत व विवेकी बनवते. शिक्षणाचे महत्त्व विशद करणारा व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा, शिक्षणा विषयी ऊमेद वाढवणाऱा ‘यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार’ स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यास व शिक्षणाचे जीवनात महत्व काय (?) याचा सारासार विचार करून, पालकांचे नव्हे तर आपले ध्येय, आपल्या आवडी-निवडी विषयी पालकांकडे स्पष्ट बोलले पाहिजे असे तिवारी यांनी सांगितले.
डॉ. गणेश राऊत यांनी, न्यू इंग्लिश स्कुलचा निकाल 100 टक्के लागण्यात तसेच स्कॉलरशिप मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक, पालक सर्वांचा सहभाग आहे. त्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे सांगितले.
प्रा राऊत सर यांनी अनेक किस्से सांगत, विद्यार्थ्यांना मनसोक्त हसायला लावून त्यांची मने जिंकली.
येनपुरे सर म्हणाले, दहावी पास झाल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी कौतुकाची थाप देणे आवश्यक असते. ते काम आज ग्रामस्थ करत आहेत हे कौतुकास्पद आहे.
वैद्यकीय अधिकारी बालाजी लकडे यांनी यांच्यावतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रत्येकी 500 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. बँक अधिकारी अमोल शिंदे, मुख्याध्यापक रोडे सर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
मुळशी काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश अण्णा पारखी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दहावी परीक्षेत शाळेचा निकाल 100 टक्के लागल्याने सर्व शिक्षकांचा यावेळी पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी… आनंद ओझरकर,डाॅ.यशराज पारखी,हरिभाऊ वाघुलकर,मल्हारी बोडके,नाना कोळी,चंद्रकांत राक्षे,महेश पारखी,विक्रम पारखी,अतुल राक्षे,राम गवारे,स्वप्निल पारखी,नामदेव भिलारे,सुर्यकांत पारखी,विलास पारखी,प्रदिप पारखी,संतोष,पारखी,बाप्पु ठाकर,योगेश आढाव,मु.रोडे सर,ॠषिकेश मारणे इ सह ग्रामस्थ मंडळी देखील उपस्थित होती..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading