Saturday, June 20, 2026
ENTERTAINMENTLatest News

अव्दैत आणि नेत्राचं खास प्रिवेडिंग फोटोशूट

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत सध्या अव्दैत आणि नेत्राच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे, पण त्यामागेही सर्वात मोठं रहस्य दडलेलं आहे. अव्दैत-नेत्राचं लग्न ठरल्यापासून रहस्यमय घटना घडत आहेत, त्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबातील सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. पण तरीही अव्दैत-नेत्राच्या लग्नाविषयीचा त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही.

मालिकेत आता आपल्याला अव्दैत-नेत्राचं प्रिवेडिंग फोटोशूट पहायला मिळणार आहे, त्यातही एक रहस्यमय घटना घडणार आहे. तेजस, तन्मय, फाल्गुनी आणि केतकी यांच्या पुढाकाराने अव्दैत-नेत्रा प्रिवेडिंग फोटोशूट करायला तयार होतात. नेत्राला प्रिवेडिंग फोटोशूट म्हणजे काय, हेही माहित नाहीये, पण अव्दैत तिला प्रेमाने सगळं समजावतो. त्या दोघांना एकमेकांच्या प्रेमात असलेलं पाहताना सर्वांनाच आनंद होतोय, त्यावरून दोघांना चिडवलंही जातंय. नेत्रा आणि अव्दैत मात्र लग्नाच्या प्रवासातील हे सारे क्षण मनसोक्त अनुभवत आहेत. मालिकत लवकरच नेत्रा अव्दैतसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे, नेत्राच्या या निर्णयामुळे नियतीला झुकावं लागणार आहे. हे येत्या महाएपिसोडमध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका सातव्या मुलीची सातवी मुलगी २३ जून रात्री १०:३० वा. फक्त आपल्या झी मराठी वर.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading