स्विफ्ट इंडियाच्या सहकार्याने अॅक्सिस बँकेची ई-बँक गॅरंटी उपायसुविधेची अंमलबजावणी
पुणे : खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या अॅक्सिस बँकेने उद्योगक्षेत्रातील पहिल्याच ई-बँक गॅरंटी (ई-बीजी) सुविधेच्या अंमलबजावणीची आज घोषणा केली. स्विफ्ट इंडियाच्या सहकार्याने डिझाईन, विकसित आणि पूर्णपणे डिजीटाईज्ड बँक गॅरंटी वितरित करणारी अॅक्सिस बँक ही पहिली बँक असून पहिले कॉर्पोरेट म्हणून गेल सह सोल्यूशनवर लाईव्ह आहे.
ई-बीजी सोल्यूशन बँक गॅरंटी डिजिटल पद्धतीने जारी करण्याची आणि वापरण्याची प्रक्रिया स्वयंचलित करते, भौतिक दस्तऐवजांची आवश्यकता दूर करते, ई-स्टॅम्प केलेल्या आणि प्रत्यक्ष स्टॅम्प केलेल्या दोन्ही हमींसाठी कार्य करते आणि जागतिक आयएसओ मानकांशी सुसंगत राहते. ई-बीजी सोल्यूशन हा एक एंड-टू-एंड बँक गॅरंटी प्रवास असून त्यामध्ये अंमलबजावणी, सल्ला, सुधारणा आणि आवाहन या गोष्टी समाविष्ट आहेत. या सर्व गोष्टींमुळे सुरक्षित, पारदर्शक आणि अखंड व्यवहार सक्षम होतो. ई-बीजी वापरून बँक गॅरंटी सुरक्षित स्विफ्ट इंडिया नेटवर्कवर आणि लाभार्थीच्या ईआरपीवर अखंडपणे विहित होते.
या सादरीकरणाबद्दल बोलताना अॅक्सिस बँकेचे होलसेल बँकिंग प्रॉडक्ट विभागाचे अध्यक्ष आणि प्रमुख श्री. विवेक गुप्ता म्हणाले, “डिजिटायझेशनमुळे मूल्य साखळी मध्ये कार्यक्षमता वाढते यावर आमचा ठाम विश्वास असल्यामुळे अॅक्सिस बँक व्यवहार बँकिंगमधील डिजिटल उपक्रमांमध्ये नेहमीच आघाडीवर राहिली आहे. स्विफ्ट इंडिया नेटवर्कचा लाभ घेऊन गेल (इंडिया) लिमिटेड साठी स्थानिक बँक हमींचा ई-सल्ला देण्यासह व्यवहार बँकिंगचे डिजिटायझेशन करण्यात उद्योगाचे नेतृत्व करताना आम्हाला आनंद होत आहे. ग्राहक अनुभव सुलभ करणे हा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे आणि या डिजिटायझेशन प्रवासात गेल (इंडिया) लिमिटेड सोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. या सुविधेमुळे बँक गॅरंटीची अखंड नोंद आणि मागोवा घेणे, व्यवहाराचा एकूण वेळ कमी होणे आणि फसवणूक होण्याची शक्यता कमी होणे यासारख्या महत्वाच्या बाबींवर लक्ष देता येईल.”
स्विफ्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किरण शेट्टी म्हणाले, “आम्ही गेल सोबत स्विफ्ट इंडियाचे मेसेजिंग चॅनेल वापरून बँक गॅरंटी डिजिटल करण्याच्या अग्रगण्य प्रयत्नांबद्दल अॅक्सिस बँकेचे अभिनंदन करतो. जागतिक स्तरासह भारतातील पेपरलेस ट्रेड फायनान्सच्या एसटीपीच्या दिशेने प्रवास करण्यासाठी आम्ही अॅक्सिस बँक आणि गेल यांच्यासोबत एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत. केवळ कागदपत्रांचा भार कमी करणे एवढेच नाही तर बँक गॅरंटीच्या एकूणच काळात बँक गॅरंटी जारी करणे, दुरुस्ती, आवाहन आणि अखंड विनाअडथळा कार्यवाही सुनिश्चित करून हे साध्य होत आहे. या नवीन सुविधेमुळे अॅक्सिस बँक जागतिक स्तरावर प्रस्थापित व्यापार आयएसओ मानकांचा वापर करून ग्राहकांना सेवा देण्यासाठी सक्षम होईल. एकूण व्यवहार वेळेत कमालीची घट होईल. आता अॅक्सिस बँक आणि गेल यांनी घालून दिलेल्या या पायाभरणीसह देशात डिजिटल, सुरक्षित आणि विना अडथळा संदेश उपायांसाठी एक परिसंस्था तयार करणे आणि वित्तीय संस्था, कॉर्पोरेट्सना व्यापार डिजिटायझेशन उद्दिष्टे पूर्ण करण्याची जाणीव करून देत पाठबळ देणे हे आमचे ध्येय आहे.”
