नुकतीच MPSC पास झालेल्या तरुणीचा मृतदेह आढल्याने खळबळ
पुणे: वेल्हे तालुक्यात राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी एका तरुणीचा मृतदेह सापडला. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला असून त्याची ओळख पटवणे अवघड जात होते. उशिरा या मृतदेहाची ओळख पटली असून मृत तरुणी नुकतीच mpsc परीक्षा पास झाली होती, यामुळे खळबळ उडाली आहे.
दर्शना दत्तू पवार, असे मृत झालेल्या तरुणीचे नाव असून तिने नुकतीच एमपीएससीची परीक्षा पास झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाली होती. ती हरवल्याची तक्रार १५ जून रोजी पुण्यातील नऱ्हे आणि सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. मात्र, आज सकाळी राजगडच्या पायथ्याशी तिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वेल्हे तालुक्यात खुनाच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. खुनाच्या घटनांमुळे वेल्हे तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या घटनेने नेमका खून कुठल्या कारणाने झाला याचा तपास करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
