Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

‘रिपाइं’ युवक आघाडीच्या प्रदेश संघटकपदी उमेश कांबळे

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ‘रिपाइं’ युवक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी बावधनचे एकनिष्ठ युवानेते उमेश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. युवक आघाडीची प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. युवक आघाडीचे अध्यक्ष पप्पू कागदे यांनी कांबळे यांच्या नियुक्तीचे पत्र दिले.
उपाध्यक्षपदी बापू गायकवाड, सिध्दार्थ चव्हाण, विनोद थोरात, किरण धाईजे, डाॅ. सौरभ गांगुर्डे, डॉ. केदारसिंग रोटले, स्वप्निल गायकवाड, संघटकपदी पुणे शहरमधून उमेश कांबळे, पुणे ग्रामीणमधून सतीश थोरात, संघटन सचिवपदी अनिल गायकवाड, अमोल नरवडे यांची, तर सहसचिवपदी अमोल गायकवाड, नरेश गवळे यांची निवड करण्यात आल्याची माहिती पप्पू कागदे यांनी दिली.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आगामी महापालिका निवडणूकीत युवकांना संधी देणार आहेत, सत्तेतही युवकांना प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन आठवले यांनी दिल्याचे पप्पू कागदे यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनात, पप्पू कागदे यांच्या नेतृत्वात राज्यभरातील युवकांचे संघटन करून महाराष्ट्रात ‘रिपाइं’ पक्षाला बळकटी देण्यासाठी मेहनत घेणार असल्याचे उमेश कांबळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading