Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आकाशवाणी पुणे वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय.. सरकारी प्रसार माध्यमांच्या हत्येचे पहिले पाऊल – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : आकाशवाणी पुणे केंद्र – प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा “केंद्रीय नभोवाणी मंत्रालयाच्या प्रसार भारतीचा” निर्णय.. हा सरकारी प्रसार माध्यमांच्या हत्येचे अघिकृत पाऊल असून काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करीत असल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले..!
केंद्रीय नभोवाणी ममंत्रालया चा या संबंधीचा लेखी आदेश देखील जारी करण्यात आला आहे . त्यानुसार 19 जूनपासून पुणे वृत्त विभागामार्फत प्रसारित होणारे आकाशवाणी वरील प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र औरंगाबाद वृत्त विभागाकडे सोपवण्यात आले आहे. तसेच या विभागाद्वारे प्रसारित केली जाणारी विविध भारतीवरील ठळक बातमीपत्रे, पुणे वृत्तांत हे विशेष बातमीपत्र आणि वृत्ताधारित कार्यक्रम देखील आता बंद होणार आहेत.
या निर्णयामागे कारण देताना प्रसार भारतीने या विभागांचे प्रमुख म्हणून काम करण्यासाठी भारतीय माहिती सेवेतील पूर्णवेळ अधिकारी दीर्घकाळापासून उपलब्ध नसल्याने(?) पुणे वृत्त विभागाची बातमीपत्रे औरंगाबादला सोपवण्यात येत असल्याचे यासंबंधीच्या आदेशात म्हटले आहे हे हास्यास्पद व केंद्र सरकारच्या प्रचार व प्रसार विभागाच्या कर्तव्य प्रणालीवर आघात करणारे व नाकर्तेपणाचेच लक्षण आहे.
लोकशाहीचा ४ था स्तंभ समजल्या जाणाऱ्या ‘सरकारी प्रसार माध्यमांची’ अघिकृत हत्या करणारे आहे..! भविष्याक “केंद्रीय नभोवाणी मंत्रालयच् बंद झाल्यास आश्चर्य वाचायला नको” अशी उपहासात्मक टिका ही काँग्रेस ने केली..! तथा कथित रोजगार मेळावे घेऊन ‘शासकीय पदांची नियुक्ती करणाऱ्या केंद्र सरकारला’, प्रसार माध्यमातली पदे भरण्या विषयी एवढी ऊदासीनता व औदासिन्य का (?) असा संतप्त सवाल देखील काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्द पत्रात केला.
कोरोना काळामध्ये पुणे वृत्त विभागाने अल्पावधीत आदेश मिळाल्यानंतर तीन मराठी राष्ट्रीय बातमीपत्रे तातडीने पुणे केंद्रावरुन प्रसारित करण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी सर्व वृत्त कारभार कालौघात मुंबईसारख्या एकाच केंद्रावर एकवटल्यास कोरोनासारख्या संकटात तिथून बातमीपत्रं प्रसारित करण्यात अडचणी आल्यास पुण्यासारखा वृत्त विभाग अतिशय महत्वाचा आहे हे देखील अधोरेखित झालं होतं.
आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टिने देखील या विभागाची बातमीपत्रे महत्वाची ठरणार आहेत परंतु तो बंदच झाला तर ही लोकशाहीची हत्या ठरेल असे ही तिवारी यांनी सांगितले.
सध्या हा विभाग एक भारतीय माहिती सेवेचा अधिकारी (प्रभारी), एक वृत्त निवेदक आणि एक हंगामी वृत्त संपादक याशिवाय हंगामी वार्ताहर. इतक्याच मनुष्यबळावर कार्यक्षमपणे चालू आहे. दिल्ली मुख्यालयाने विविध प्रसंगांच्या अनुषंगाने अतिरिक्त कार्यभार सोपवल्यास तो देखील सांभाळण्यास हा विभाग सक्षम आहे. असे असताना केवळ पूर्णवेळ भारतीय माहिती सेवेचा अधिकारी उपलब्ध नाही म्हणून पुण्यासारख्या महत्वाच्या केंद्रावरील प्रादेशिक वृत्त विभागच बंद करणे हे समर्थनीय नाही. पुणे शहर ऐतिहासीक, सामाजिक क्रांतीकारकांचे शहर असून, राज्याची सांस्कृतीक राजधानी व विद्येचे माहेरघर समजले जाते त्यामुळे हा पुणेकरांचा अवमान देखील आहे. एकीकडे पंतप्रधान एख ही पत्रकार परीषद घेऊन राज धर्माचे व उत्तरदायीत्वाचे पालन करत नाहीत.. तर दुसरीकडे सरकारकडे केलेले कोणतेही काम सांगण्या सारखे नसल्यानेच की काय केंद्र सरकार स्वतःच अघीकृत सरकारी माध्यमांचा क्षुल्लक कारणांच्या आधारे गळा घोटत आहे व केंद्र सरकारच्या स्व जबाबदारी पासुन पळ काढीत असल्याचा आरोप देखील काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला..!!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading