एसएमईएफच्या ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांनी हायब्रिड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम सुरू करण्यासाठी थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी सोबत केली भागीदारी
पुणे : सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशनच्या (एसएमईएफ) ब्रिक ग्रु
करण्यासाठी थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी, फिलाडेल्फिया यांच्यासोबत भागीदारी केली आहे. हा महत्त्वाचा उपक्रम
भारतीय उच्च शिक्षणातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड असून त्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा अनुभव मिळतो आणि ३० हजार अमेरिकी डॉलरपर्यंतची बचत होते. बी.आर्क.,अभियांत्रिकी किंवा अंडरग्रेजुएट डिझाईन पदवी असलेल्या पदवीधरांना आता या अत्यंत मागणी असलेल्या मास्टर ऑफ सायन्स कोर्ससाठी अर्ज करण्याची विशेष संधी प्राप्त झाली आहे.
विद्यार्थ्यांना असामान्य मार्गदर्शन मिळवून देणे आणि भारताच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्याला आकार देतील अशा चांगल्या व्यक्ती विकसित करणे हे एसएमईएफच्या ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संस्थापक– सं
एसएमईएफच्या ब्रिक ग्रुपच्या या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना पुण्यात किंवा भारतात राहून थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी,फिलाडेल्फियामधून एमएस इन सस्टेनेबल डिझाईन प्रोग्रामची पदवी मिळविण्याची एक अनोखी संधी मिळत आहे. पर्यावरणावरील प्रभाव कमी करणे, वापरकर्त्यांच्या भल्याला प्राधान्य देणे आणि बांधीव पर्यावरणाची कार्यक्षमता वाढविणे यांच्यावर लक्ष केंद्रित करून शाश्वत डिझाईन करणे ही भारताच्या वेगवान विकासामध्ये महत्त्वाची विद्याशाखा बनली आहे. एसएमईएफच्या ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर च्या प्राचार्य आणि सस्टेनेबल गव्हर्नंसमधील एक नामवंत तज्ज्ञ असलेल्या डॉ. पूर्वा केसकर या कार्यक्रमाला मार्गदर्शन करतील.
यामध्ये स्वीकृत उमेदवारांना नामवंत सस्टेनेबिलिटी व्यावसायिक आणि प्रशिक्षकांच्या टीमने विकसित केलेल्या अत्याधुनिक अभ्यासक्रमाचा फायदा होईल. हायब्रीड प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैयक्तिक आणि ऑनलाइन लर्निंग मॉड्यूल्स उपलब्ध होतील. त्यामुळे लवचिकता आणि विविध पार्श्वभूमीतील पीअर्ससोबत सहकार्य करणे शक्य होईल.या कार्यक्रमात दोन्ही जगातील सर्वोत्कृष्ट गोष्टींचा मेळ घालण्यात आलेला आहे. तसेच अग्रगण्य तज्ञांकडून शिकण्याची आणि आंतरराष्ट्रीय डिझाईन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याद्वारे पदवीधरांना भारतातील आणि त्याच्याही बाहेरील शाश्वत डिझाईनच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज असल्याची खात्री करून दिली जाते.
एसएमईएफच्या ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी यांच्यातील सहयोग हे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील एक परिवर्तनकारी पाऊल आहे. यामध्ये दोन खंडांना जोडून नावीन्यता, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी एक व्यासपीठ तयार करण्यात येत आहे. एमएस इन सस्टेनेबल डिझाईन या हायब्रीड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रामची सुरूवात ही शैक्षणिक संधींच्या एका नवीन युगाचे प्रतीक आहे. शाश्वत डिझाईनच्या क्षेत्रातील पुढच्या पिढीच्या नेतृत्वाला सक्षम करण्याच्या दोन्ही संस्थांच्या कटिबद्धतेला त्यामुळे बळकटी मिळाली आहे.
