बारावी नंतरच्या करिअर निवडी संदर्भात विनामूल्य “दिशादर्शक” शिबीर
पुणे : नुकताच राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल लागला असून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी निकालानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच शाखा निवडीसंदर्भात विद्यार्थी आणि पालकांसाठी “दिशादर्शक” मागर्दर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. फिटजी पुणे शाखेच्या वतीने मंगळवार, दि. २० जून २०२३ रोजी सायंकाळी ५:०० वाजता स्वारगेट येथील डॉ. नितू मांडके इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात याचे आयोजन केले आहे. हे समुपदेशन मार्गदर्शनपर शिबीर विनामूल्य असून विद्यार्थी आणि पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन फिटजी पुणे केंद्र प्रमुख तसेच भौतिकशास्त्र विभाग प्रमुख, राजेश कर्ण यांनी केले आहे. “दिशादर्शक” हा फिटजीचा एक सामाजिक उपक्रम असून विद्यार्थ्यांचे नियमबद्ध शैक्षणिक धोरण आणि पालकांचे प्रोत्साहन यासंदर्भात आश्वासक मार्गदर्शनाचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
जेईई, बिटसॅट आणि एमएचटीसीईटी निकालानंतर इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची महाविद्यालय आणि शाखा कशी निवडावी! ही मुख्य चिंता असते. या शिबिरामध्ये ऑनलाइन प्रवेश समुपदेशनाशी संबंधित महत्त्वाच्या माहितीवर तपशीलवार चर्चा केली जाणार आहे. राजेश कर्ण, हे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या विविध शाखांबद्दल मार्गदर्शन करतील आणि विद्यार्थ्यांना उच्च महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्याने कोणते फायदे मिळतील याबद्दल ही संपूर्ण माहिती देतील. जेईई मेन आणि ऍडवान्सडच्या मागील वर्षाचा कटऑफ, आयआयटी आणि एनआयटीमधील जागा उपलब्धता यावर तपशीलवार चर्चा हा देखील या सत्राचा एक भाग असेल. निखिल भटनागर हे जेओएसएए बद्दल महत्वाचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, जागा निवड प्रक्रिया, एमएचटीसीईटी आणि बिटसॅटच्या जागांचा कटऑफ, पसंतीच्या महाविद्यालयांची निवड पद्धत यांबद्दल महत्त्वाचे सखोल मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर सत्राच्या शेवटी उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल.
दिशादर्शक शिबिरात सहभागी होण्यासाठी www.bit.ly/dishadarshak23 या लिंकवर जाऊन नोंदणी करावी अथवा अधिक माहितीसाठी 8956496134, 8956496135, 8956496131, 8956603151 यावर संपर्क करा.
