Thursday, June 4, 2026
Latest NewsSports

महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टीव्हलमध्ये चॅलेंज लढतीत विदित गुजराथी, रौनक साधवानी यांना विजेतेपद 

नागपूर : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टीव्हलमध्ये चॅलेंज लढतीत विदित गुजराथी आणि रौनक साधवानी या युवा भारतीय खेळाडूंनी अनुक्रमे पीटर स्विडलर आणि नायजेल शॉर्ट या अनुभवी खेळाडूंवर निर्णायक विजय मिळवित वर्चस्व गाजविले.
 
नागपूरमधील नैवेद्यम नॉर्थस्टार संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत चॅलेंज लढतीत गुणवान युवा खेळाडू विरुद्ध अनुभवी ग्रँडमास्टर्स असेच या दोन्ही लढतींचे स्वरूप होते. चॅलेंज लढतींमध्ये प्रत्येकी 4 क्लासिकल लढती, 4रॅपिड लढती आणि 8ब्लिट्झ लढतींचा समावेश होता. केवळ 18 वर्षे वयाच्या विदितने याआधीच 2700 एलो गुणांकनाच्या एलिट क्लबमध्ये स्थान मिळविले आहे, तब्बल पाच वेळचा रशियन विजेता आणि तीन वेळा कैंडिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या ग्रँडमास्टर पीटर स्विडलरला 17.5 विरुद्ध 10.5 गुणांनी पराभूत करताना विदितने आपण जागतिक स्तरावर उतरण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.
 
दुसऱ्या चॅलेंज लढतीत रौनक साधवानीने नायजेल शॉर्टचा 20-8 असा एकतर्फी पराभव केला. विशेष म्हणजे रौनकने तीन वर्षांपूर्वी नायजेल शॉर्टच्या प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला होता. रौनकने कालच या लढतीत निर्णायक आघाडी घेतली होती. आजचे सामने जिंकताना त्याने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. 
 
ब्लिट्झ लढती खेळणे आपल्याला विशेष करून आवडते, असे सांगून रौनक विजयानंतर म्हणाला, की या लढतीतील कामगिरीवर मी समाधानी आहे. जागतिक दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध एकास एक अशा लढती खेळण्याची विदित व रौनक या दोघांची ही पहिलीच वेळ होती. तसेच हे दोघेही मानांकनात सरस असल्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु त्यांचे दोन्ही प्रतिस्पर्धी अव्वल दर्जाचे आणि अनुभवी असल्यामुळे या लढती चुरशीच्या होतील, अशी अपेक्षा होती. परंतु विदित व रौनक यांनी त्या तुलनेत एकतर्फी विजयाची नोंद केली. रौनकने ब्लिट्झ लढतींमध्ये आपले कौशल्य दाखवून देताना शॉर्टविरुद्ध 4 पैकी 3.5 गुणांची कमाई केली. विदितला मात्र ब्लिट्झ लढतींमध्ये झुंज द्यावी लागली. त्याने 4 पैकी 2.5 गुणांची कमाई केली. विदितने क्लासिकल आणि रॅपिड लढतींमध्ये तुलनेने सरस कामगिरी केली. मात्र ब्लिट्झ लढतींमध्ये त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
 
दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीअखेर भारताच्या वेदांत पानेसर, रोहित कृष्णा एस, पोलंडच्या सेपर मिलोझ या तीन खेळाडूंनी ६.५ गुणांसह संयुक्तरित्याआघाडी प्राप्त केली आहे. 
 
भारताच्या रोहित कृष्णा एस याने जॉर्जियाच्या व तिसऱ्या मानांकित लुका पैचाजचा पराभव करून सनसनाटी विजयासह आघाडी प्राप्त केली. वेदांत पानेसर व सेपर मिलोझ यांच्यातील लढत बरोबरीत सुटली व या दोघांनी प्रत्येकी ६.५ गुण मिळवले. वेदांतने १९ चालींमध्ये सेपर मिलोझला बरोबरीत रोखले. याचबरोबर प्रदर्शनीय सामन्यांचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी विदित गुजराथी, रौनक साधवानी, पीटर स्विडल, अभिजीत कुंटे यांनी १६००एलो रेटिंग असलेल्या खेळाडूंबरोबर सामने खेळले. 
 
स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके, फिडे चेस इन एज्युकेशन कमिशनचे प्रमुख जेरी नाश, एआयसीएफ चेस इन स्कुल्स कमिशनचे अध्यक्ष एके वर्मा आणि  महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष अभिजीत कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले. 
 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल:  महाराष्ट्र चॅलेंज लढत: रॅपिड स्पर्धा: तिसरी फेरी: 
विदित गुजराथी (13गुण) बरोबरी वि. पीटर स्विडलर (9गुण);
नायजेल शॉर्ट(7.5गुण) वि.वि.रौनक साधवानी (14.5)
 
चौथी फेरी:
पीटर स्विडलर(9गुण) पराभुत वि. विदित गुजराथी (15गुण);
रौनक साधवानी(16.5गुण) वि.वि.नायजेल शॉर्ट (7.5गुण);
 
ब्लिट्झ स्पर्धा: पाचवी फेरी:
विदित गुजराथी (15गुण) पराभुत वि. पीटर स्विडलर(10गुण);
नायजेल शॉर्ट (8गुण) बरोबरी वि.रौनक साधवानी(17गुण);
 
सहावी फेरी: 
पीटर स्विडलर(10गुण) पराभुत वि.विदित गुजराथी(16गुण);
रौनक साधवानी(18गुण) वि.वि.नायजेल शॉर्ट(8गुण)
 
सातवी फेरी:
विदित गुजराथी (17गुण) वि.वि. पीटर स्विडलर(10गुण);
नायजेल शॉर्ट (8गुण) पराभुत वि.रौनक साधवानी(19गुण);
 
आठवी फेरी:
पीटर स्विडलर(10.5 गुण) बरोबरी वि.विदित गुजराथी(17.5गुण)
रौनक साधवानी(20गुण) वि.वि.नायजेल शॉर्ट(8गुण).
 


महाराष्ट्र ग्रँडमास्टर ओपन स्पर्धा:आठवी फेरी:
वेदांत पानेसर(भारत)(६.५गुण)बरोबरी वि.सेपर मिलोझ(पोलंड)(६.५गुण)
लुका पैचाज(जॉर्जिया)(५.५गुण)पराभुत वि.रोहित कृष्णा एस(भारत) (६.५गुण);
फेडोरोव्ह अॅलेक्सी(बेलारूस)(६गुण)वि.वि.सम्मेद शेटे(भारत)(५.५गुण)
बाबुजियन लेव्हॉन (अर्मेनिया)(५.५गुण)बरोबरी वि.दीप सेनगुप्ता(भारत)(५.५गुण);
लक्ष्मण, आर.आर.(भारत )(५.५गुण)बरोबरी वि.अलेक्झांड्रोव्ह अलेक्सेज(बेलारूस)(५.५गुण);
नीलाश साहा (भारत)(६गुण)वि.वि.रित्विज परब(भारत )(५गुण);
वियानी अँटोनियो डिकूना(भारत)(५.५गुण)बरोबरी वि.राहूल व्हीएस(भारत)(५.५गुण);
कुशाग्र मोहन(भारत)(५.५गुण)बरोबरी वि. संकेत चक्रवर्ती(भारत)(५.५गुण);
मयंक चक्रवर्ती(भारत)(६गुण)वि.वि.बर्माकिन व्लादिमीर(रशिया)(४.५गुण);
सावचेन्को बोरिस(रशिया)(५.५गुण)वि.वि.गर्व राय(भारत)(४.५गुण).

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading