Thursday, June 4, 2026
BusinessLatest News

सोनीने मग्न करणाऱ्या इमर्सिव्ह ध्वनीसह अप्रतिम पिक्चरसाठी ब्रॅव्हिया एक्स८२एल (BRAVIA X82L) मालिका बाजारात आणली  

नवी दिल्ली:  सोनी इंडियाने पिक्चरची अप्रतिम गुणवत्ता आणि अप्रतिम ध्वनीसह नवीन ब्रॅव्हिया एक्स८२एल (BRAVIA X82L) टेलिव्हिजन मालिकेची आज घोषणा केली. नवीन ब्रॅव्हिया एक्स८२एल (BRAVIA X82L) टेलिव्हिजन मालिका द्रुक् व श्राव्य दोन्ही गोष्टींना एका वेगळ्या वरच्या स्तरावर घेऊन जाते आणि चित्र व ध्वनीच्या प्रगत तंत्रज्ञानाद्वारे गूगल टीव्ही च्या माध्यमातून मनोरंजनाच्या जगालाच सुंदर रंगांमध्ये साक्षात जिवंत करते.

X1 4K एचडीआर पिक्चर प्रोसेसरसह उल्लेखनीय पिक्चर गुणवत्तेचा अनुभव. डॉल्बी व्हिजनTM आणि डॉल्बी अॅटमॉसTMसह सिनेमाचा थरार अनुभवा .नवीन X82L टीव्ही मालिकेमध्ये X बॅलेन्स्ड स्पीकर आणि अकॉस्टिक मल्टी ऑडिओद्वारे भरून टाकणाऱ्या आवाजाचा अनुभव घ्या. X82L मालिका गूगल टीव्हीसह स्मार्ट वापरकर्ता अनुभव देते, जी 700,000 हून अधिक चित्रपट आणि टीव्ही सिरीजसह 10,000 हून अधिक अॅप्स आणि गेम्सद्वारे अखंड मनोरंजन देते. हे अॅपल एयरप्ले 2 (Apple Airplay2) आणि होमकिट (HomeKit) बरोबर देखील हे सहजतेने व अखंड काम करते. हॅंड्स फ्री वॉइस सर्च वैशिष्ठ्याने तुम्ही तुमचे आवडते कार्यक्रम आणि चित्रपट लावण्यासाठी टीव्ही बरोबर संवाद साधू शकता. नवीन X82L टीव्ही मालिका आता आयमॅक्स (IMAX) वर्धित चित्रपटांच्या सर्वात मोठ्या संग्रहाचा  आणि उच्चतम गुणवत्तेच्या प्यूअर स्ट्रीमTM 80 एमबीपीएससह (Pure Stream™ 80mbps) डॉल्बी अॅटमॉस सामग्रीचा आनंद घेण्यासाठी ब्रॅव्हिआ कोअर अॅप (BRAVIA CORE app) सह येत आहे. ब्रॅव्हिया एक्स८२एल (BRAVIA X82L) मधील गेम मेन्यू वैशिष्ठ्य तुम्हाला गेमिंगची स्थितीसेटिंग्ज  आणि गेमिंग सहाय्य कार्ये हे सर्व एकाच ठिकाणी सहजपणे उपलब्ध करून देते

 

किंमत आणि उपलब्धता:

मॉडेल किंमत उपलब्ध होण्याची तारीख
KD-55X82L ९१,९९०/- २ जून २०२३ पासून
KD-65X82L १२४,९९०/- २ जून २०२३ पासून
KD-75X82L लौकरच जाहीर होईल लौकरच  जाहीर होईल

हे मॉडेल्स भारतातील सर्व प्रमुख सोनी केंद्रे, प्रमुख इलेक्ट्रॉनिक दुकाने आणि भारतातील ई कॉमर्स पोर्टलवर उपलब्ध असतील.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading