Thursday, June 4, 2026
Latest NewsMAHARASHTRA

शिवराज्याभिषेक दिनी आप च्या स्वराज्य यात्रेचा समारोप

पुणे:26मे रोजी पंढरपूर येथून निघून, गेले 10 दिवसभर उन्हात हजारो लोकांशी संवाद साधत, 800 किलोमीटर पेक्षा अधिक प्रवास करीत, 8 जिल्हयातून,12 लोकसभा , 30 विधानसभा, 9 महानगरपालिका, 12 नगर पालिका , परीषद क्षेत्रातून जात, ही आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा रायगडावर समाप्त झाली. आप राष्ट्रीय पक्ष झाल्यावरची ही पहिली लक्षवेधी संवादयात्रा ठरली आहे.

तत्पूर्वी दिनांक 5 जून रोजी महाड गावातून पदयात्रा काढण्यात आली. महाड येथील चवदार तळ्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

या यात्रा दरम्यान एक लाख पेक्षा अधीक कार्यकर्ते , समर्थक जोडले गेले तर विविध माध्यमातून पाच लाख लोकांपर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या आप ची भूमिका पोहचवण्यात यश आले. या यात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवाउत्साह आला आहे. यात्रे दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये देशभक्ती आणि संघटनशक्ती याचा उत्तम संगम पहायला मिळाला.
सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांनी या यात्रेची दखल घेतल्याचे दिसते आहे. अनेक राजकीय नेत्यांनी पुढील काळात आप मध्ये प्रवेश करण्याचा मनोदय पक्ष नेतृत्वाकडे व्यक्त केला आहे.

सद्यस्थितीतील मतपेटीतून सत्तेसाठी सर्व तत्वहीन तडजोडी करणारे खोके आमदार जन्माला येणे हे लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. खोकेवाल्या सरकारमुळे महाराष्ट्र कलंकित झाला आहे.
सर्वसामान्यांना व्यवस्थेला प्रश्न विचारायला शिकविण्यासाठी ही आम आदमी पक्षाची स्वराज्य यात्रा होती . या यात्रेमुळे या सर्वसामान्यांना ताकद मिळून त्यांची सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन आम आदमी पार्टी करत आहे.

जनतेची वेदना, प्रश्न समजून घेणे, संवादाचे पूल बांधणे, पक्षाची ध्ययधोरणे पोहचवणे,कार्यकर्त्यांच्या नेतृत्व गुणांना संधी देणे हा या यात्रेचा उद्देश होता आणि त्या अनुषंगाने सर्व नियोजन करण्यात आले होते ,तो उद्देश सफल झाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading